Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ प्रकरणातील मानहानीचा खटला रद्द करण्यासाठी राहुल गांधींचा प्रयत्न; घेतली उच्च न्यायालयात धाव

बंगळुरूस्थित पत्रकार गौरी लंकेश (Gauri Lankesh) यांच्या हत्येशी उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) संबंध असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी २०१७ मध्ये दाखल केलेला मानहानीचा खटला रद्द करण्यासाठी काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 18, 2023 | 07:20 AM
‘त्या’ प्रकरणातील मानहानीचा खटला रद्द करण्यासाठी राहुल गांधींचा प्रयत्न; घेतली उच्च न्यायालयात धाव
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : बंगळुरूस्थित पत्रकार गौरी लंकेश (Gauri Lankesh) यांच्या हत्येशी उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) संबंध असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी २०१७ मध्ये दाखल केलेला मानहानीचा खटला रद्द करण्यासाठी काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दाखल खटला रद्द करण्याच्या मुख्य मागणी गांधी यांनी याचिकेतून केली आहे.

याचिकेवर मंगळवारी न्या. सारंग कोतवाल यांच्या एकलपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने सुनावणी ५ डिसेंबर रोजी निश्चित केली. बंगळुरूस्थित पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी राहत्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर जो कोणी भाजप-आरएसएस विचारसरणीच्या विरोधात बोलतो त्याच्यावर दबाव आणला जातो अन्यथा मारहाण होते किंवा मारले जाते, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केले होते.

दुसरीकडे, पत्रकारांच्या हत्येसाठी आरएसएस जबाबदार असल्याचे वक्तव्य सीपीआय (एम) सचिव सीताराम येचुरी यांनी केले होते. त्यानंतर, वकील धृतीमान जोशी यांनी भादंवि कलम ४९९ व ५०० अंतर्गत राहुल व सोनिया गांधी तसेच येचुरी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार नोंदवली. त्याची दखल घेऊन न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गांधी व येचुरी यांना समन्स बजावले आणि ४ जुलै रोजी दोघेही न्यायालयात हजर होते.

गांधी यांनी तक्रार रद्द करण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्याकडे केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आल्यानंतर गांधी यांनी त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Web Title: Congress leader rahul gandhi attempt to quash defamation case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2023 | 07:20 AM

Topics:  

  • Congress
  • maharashtra
  • political news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप
1

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
2

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
3

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी
4

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.