Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : युद्धपरिस्थितीमध्येही राजकारण? “डोनाल्ड ट्रम्पविरोधात मोदींचा एकही शब्द नाही, राहुल गांधींचे टीकास्त्र

Rahul Gandhi : मध्य पूर्व आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये भाषण केले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी या भाषणावर टीका केली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 24, 2026 | 11:38 AM
Rahul Gandhi slams Narendra Modi

Rahul Gandhi slams Narendra Modi

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
  • लोकसभेतील मोदींच्या भाषणामध्ये डोनाल्ड ट्रम्पवर एकही शब्द नाही
  • राहुल गांधींनी केंद्र सरकारकडे धोरण नसल्याची टीका
Rahul Gandhi : गुजरात : मध्यपूर्व भागात युद्धाची तीव्रता वाढली असून यामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे (US-Israel Iran War) संपूर्ण आशिया अस्थिर झाला आहे. विध्वंसक युद्धाचा फटका भारताला देखील बसला आहे. गॅस आणि तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेमध्ये भूमिका मांडली असून आज ते राज्यसभेला संबोधित करणार आहेत. मात्र त्यांच्या या भाषणावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये भाषण करताना कोरोना काळाचा दाखला देत त्यावेळी जसा संयम दाखवला तसाच यावेळी सुद्धा दाखवण्याचे आवाहन देशातील जनतेला केले आहे. त्यांच्या या भाषणावर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला. ते गुजरातमधील वडोदरा येथे आयोजित आदिवासी अधिकार संविधान परिषदेत सामील झाले. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होमग्राऊंडवरुन त्यांच्यावर जोरदार टीका केली.

हे देखील वाचा : जागतिक युद्धाची झळ भारतापर्यंत..राज्यसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडणार सत्यस्थिती

काय म्हणाले राहुल गांधी?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना केंद्र सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नसल्याचे म्हटले. राहुल गांधी यांनी देशासमोर उभ्या असलेल्या आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांवर सरकारकडे ठोस दिशा नाही अशा शब्दांत टीका केली. तसेच देशात सामान्य लोकांच्या गॅसबाबत एवढं संकट निर्माण झालं असताना मोदींनी अमेरिकेच्या विरोधात एक शब्दही का काढला नाही असा घणाघाती सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.

भारतीयांवर कराचा बोजा वाढला

भारत-अमेरिका व्यापार करारावरुन देखील राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, “कृषी क्षेत्र प्रथमच अमेरिकेसाठी खुले केले. तसेच मोदी सरकारने भारताचा मौल्यवान डेटा अमेरिकेला दिल्याची टीका त्यांनी केली. मोदी सरकारने अमेरिकन कंपन्यांना कर सवलती दिल्या, तर भारतीयांवर कराचा बोजा वाढल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. आपण अमेरिकेला खूप काही दिलं, पण बदल्यात काही मिळालं नाही,” अशी खंत देखील राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

हे देखील वाचा : सकाळी ७:२८ ला आला ईमेल आणि दिल्ली हादरली; विधानसभा अन् मेट्रो स्टेशनवर बॉम्बची धमकी

पंतप्रधान मोदी राज्यसभेमध्ये मांडणार भूमिका

सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु आहे. काल (दि.23) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये सत्यस्थिती मांडली. जागतिक युद्धाच्या वातावरणामध्ये भारताची भूमिका काय यासह त्यांनी भारतीयांना संयम ठेवण्याचे आणि एकत्रित राहण्याचे देखील आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी २ वाजता राज्यसभेत मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर निवेदन देतील. यावर देशाची भूमिका आणि देशातील सध्याची परिस्थिती ते मांडणार आहेत. यामध्ये देश म्हणून भारत काय भूमिका घेणार आणि बजावणार याबाबत पंतप्रधान मोदी मत मांडणार आहेत.

Web Title: Congress rahul gandhi targets pm narendra modi speech in lok sabha on iran israel war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • Iran-Israel War
  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

GSLV-F17: भारताची अवकाशात गरुडझेप! इस्रोकडून ‘EOS-05’ भू-प्रतिबिंबन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधानांकडून कौतुक
1

GSLV-F17: भारताची अवकाशात गरुडझेप! इस्रोकडून ‘EOS-05’ भू-प्रतिबिंबन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधानांकडून कौतुक

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट
2

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट

‘खासगी खाणीकडून ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर रद्द करा, मित्रों’च्या फायद्यासाठी महाग वीज कशासाठी?’ – नाना पटोले
3

‘खासगी खाणीकडून ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर रद्द करा, मित्रों’च्या फायद्यासाठी महाग वीज कशासाठी?’ – नाना पटोले

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
4

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.