पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आखाती देशातील युद्धावर राज्यसभेमध्ये भाषण करणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु आहे. काल (दि.23) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये सत्यस्थिती मांडली. जागतिक युद्धाच्या वातावरणामध्ये भारताची भूमिका काय यासह त्यांनी भारतीयांना संयम ठेवण्याचे आणि एकत्रित राहण्याचे देखील आवाहन केले. “युद्धग्रस्त भागातून आतापर्यंत ३ लाख ७५ हजार भारतीयांना सुखरूप बाहेर काढले असल्याचे सांगत पंतप्रधानांनी भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. लोकसभेनंतर आता पंतप्रधान मोदी हे राज्यसभेला संबोधित करणार आहेत.
हे देखील वाचा : लोकसभेच्या रचनेत होणार मोठे बदल; काय आहे सरकारचे ‘मिशन ८१६’?
आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा दहावा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी २ वाजता राज्यसभेत मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर निवेदन देतील. यावर देशाची भूमिका आणि देशातील सध्याची परिस्थिती ते मांडणार आहेत. यामध्ये देश म्हणून भारत काय भूमिका घेणार आणि बजावणार याबाबत पंतप्रधान मोदी मत मांडणार आहेत.
हे देखील वाचा : गॅस सिलिंडरच्या वजनात कोणतीही कपात नाही; यापुढेही 14.2 किलोचाच गॅस मिळणार
युद्धकाळातली ‘हाय-व्होल्टेज’ बैठक आणि साठेबाजीला इशारा
पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये भाषण करण्यापूर्वी सलग साडेतीन तास उच्चस्तरीय बैठक घेऊन देशातील इंधन आणि खत साठ्याचा आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट शब्दांत आदेश दिले आहेत की, युद्धाच्या नावाखाली देशात कोणीही जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा काळाबाजार करता कामा नये. पेट्रोलियम, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने ‘डिस्ट्रिब्यूशन आणि लॉजिस्टिक्स’ व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या तेल टंचाईच्या प्रश्नावर मोदींनी “सर्व काही नियंत्रणात आहे” असा विश्वास दिला.
भारतीयांची सुरक्षा हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात तेल आणि वायूची कमतरता भासू नये यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी आता २७ देशांऐवजी ४१ देशांकडून आयात केली जात आहे. ते असेही म्हणाले की, पश्चिम आशियामध्ये राहणाऱ्या सुमारे १ कोटी भारतीयांची सुरक्षा हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.






