Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अहंकारी सरकारचा अंत जवळ आलाय…’, राहुल गांधींना ताब्यात घेताच मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल; सरकारवर साधला निशाणा

Hemant Dhome: राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मराठी अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे ने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर केली. "आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार" असे म्हणत त्याने सरकारवर टीका केली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 22, 2026 | 10:38 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Hemant Dhome Reacts On Rahul Gandhi Detain:दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाला आता राजकीय वर्तुळातून देखील पाठिंबा मिळताना दिसत आहे. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात लाठीचार्ज करण्यात आला यावेळी अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचे आपण पाहिले. पोलिसांनी तरूणांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. यावेळी राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. जंतरमंतर वरील आंदोलनाला पहिल्यापासून कलाकार मंडळींनी पाठिंबा दिला आहे. राहुल गांधीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या जोरदार व्हायरल होत असून त्याने संताप व्यक्त केला आहे.

हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट

हेमंत ढोमेने त्याच्या स्टोरीवर राहुल गांधींचे फोटो शेअर करत लिहिले, ” भारताचा विरोधी पक्षनेता असा उचलून नेणाऱ्या अहंकारी सरकारचा अंत आता जवळ आला आहे. आता तरूण पोरं तुम्हाला उचलून फेकणार हे नक्की.”

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Saurabh Gokhale : अभिनेत्याने केली सरकारची पाठराखण? “मी हिंदुविरोधी गोष्टींना…” सौरभ गोखलेचे ‘ते’ विधान आले चर्चेत

नेमकं काय घडलं?
नीट पेपरफुटी व गैरव्यवहाराविरोधात कॉक्रोच जनता पार्टी मागील अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. 20 जुलैला सुरू असलेल्या या मोर्चात तरूण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तरूण आंदोलकांना व विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीनंतर कॉंग्रेसने आक्रमक होत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आंदोलन केलं. विशेष म्हणजे या आंदोलनाबद्दल पोलिसांना कळू नये, ही काळजी कॉंग्रेसने घेतली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जात असल्याचे सांगून सर्वांना तेथे बोलावण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना आंदोलनाची माहिती देण्यात आली आणि जवळपास दोन तास आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर पोलिसांनी राहुल गांधींसह इतर नेत्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर सर्वांची सुटका करण्यात आली.

Hindustani Bhau : लाठीचार्जच्या मुद्द्यावरून हिंदुस्थानी भाऊने सरकारला केली विनंती! “विद्यार्थ्यांवर हात उचलू….”

Web Title: After rahul gandhis detention hemant dhome shares strong post the end of an arrogant government is near

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • PM Modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
1

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

PM Modi Gold Appeal : सोन्यात पैसे गुंतवा, पण दागिने खरेदी करू नका! पीएम मोदी का करताहेत आवाहन? ‘हे’ आहे मोठं गणित
2

PM Modi Gold Appeal : सोन्यात पैसे गुंतवा, पण दागिने खरेदी करू नका! पीएम मोदी का करताहेत आवाहन? ‘हे’ आहे मोठं गणित

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला
3

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी
4

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.