Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal election 2026 : BJP विजयी मार्गावर? ममता दीदींनी सरळ राजकारण केलं असतं तर…राहुल गांधींच्या वक्तव्याने खळबळ

West Bengal Election 2026 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 23, 2026 | 01:31 PM
Rahul Gandhi slams Dharmendra Pradhan

Rahul Gandhi slams Dharmendra Pradhan

Follow Us
Follow Us:
  • पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी
  • खासदार राहुल गांधी यांनी शेअर केला व्हिडिओ
  • राहुल गांधी यांचा ममता बॅनर्जींना खोचक टोला
West Bengal election 2026 : नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये आणि तमिळनाडूमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 40 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. दोन्ही राज्यातील निवडणूका या भाजपसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा गड फोडण्यासाठी आणि त्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपने पूर्ण रणनीती आखली आहे. दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खास सोशल मीडिया पोस्ट करुन मतदारांना आवाहन केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यांनी महिला व तरुण मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मात्र पश्चिम बंगालमधील व्हिडिओमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या विजयाचे संकेत दिले आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित करत युती मध्ये निवडणूक लढल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

हे देखील वाचा : Bengal Elections 2026: पहिल्या टप्प्यात चुरशीची लढत; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, “पश्चिम बंगालच्या बंधू आणि भगिनींनो, या वैचारिक लढाईत भाजपला फक्त काँग्रेसच हरवू शकते. ते हक्क हिसकावून घेतात, आम्ही देतो. ते संविधान नष्ट करतात, आम्ही त्याचे रक्षण करतो. त्यांना भारताची विविधता पुसून टाकायची आहे, भाजपचे एकच विचार आहे की एक देश एक भाषा, एक संस्कृती पण आपल्या देशामध्ये अनेक संस्कृती आहेत. देशामध्ये विविध भाषा, धर्म आणि विचारधारा आहेत. आम्ही बंगालसोबत प्रत्येक संस्कृती, प्रत्येक भाषेचा आदर करतो. चला, काँग्रेसला प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि बंगालमध्ये न्याय, सन्मान आणि प्रगतीचे सरकार स्थापन करूया.”असे मत राहुल गांधी यांनी मांडले आहे.

पश्चिम बंगाल के भाइयों-बहनों, विचारधारा की इस लड़ाई में BJP को सिर्फ कांग्रेस ही हरा सकती है। वो अधिकार छीनते हैं, हम दिलाते हैं। वो संविधान मिटाते हैं, हम बचाते हैं। वो भारत की विविधता मिटाना चाहते हैं, हम बंगाल के साथ हर संस्कृति, हर भाषा का सम्मान करते हैं। आइए, कांग्रेस को… pic.twitter.com/M8WhqZoici — Rahul Gandhi (@RahulGandhi) April 22, 2026

या एक मिनिट ४७ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, सुमारे एक मिनिट १५ सेकंदांनंतर राहुल गांधी म्हणतात, ‘जर ममताजींनी स्वच्छ सरकार चालवले असते, जर त्यांनी बंगालचे ध्रुवीकरण केले नसते, तर भाजपसाठी मार्ग मोकळा झाला नसता. काँग्रेस भाजपशी लढते. भाजपलाही माहित आहे की फक्त काँग्रेसच त्यांना रोखू शकते. असे स्पष्ट मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे काँग्रेस पार्टीला मत द्या आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पार्टीचे सरकार आणा, असे आवाहन राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला केले आहे.

हे देखील वाचा : गजराज आले मतदानाला! झाडग्राममध्ये मतदान केंद्रात थेट महाकाय हत्तीची एन्ट्री

ते म्हणाले की, भाजप निवडणूका चोरी करते. भाजपने हरयाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये निवडणुकांची चोरी केली. SIR हे निवडणुक चोरी करण्याचा प्रकार आहे. भारतात या दोन्ही भाजप व काँग्रेसच्या विचारधारा लढत आहेत. आम्ही भारत जोडो यात्रेमध्ये दुष्मनीच्या बाजारात मोहब्बतचे दुकान उघडायचे असल्याचे मत राहुल गांधी यांनी मांडले.

Web Title: Congress rahul gandhi video on west bengal election 2026 live marathi news mamata banerjee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Mamata Banerjee
  • Rahul Gandhi
  • West Bengal Election 2026
  • West Bengal Election Result 2026

संबंधित बातम्या

‘शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवली’, पीडित तरुणाला समोर आणत राहुल गांधींचा संसदेतून गंभीर आरोप
1

‘शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवली’, पीडित तरुणाला समोर आणत राहुल गांधींचा संसदेतून गंभीर आरोप

Rahul Gandhi On PM Modi Post: ‘मध्यरात्रीचा Video… अन् 70 मिनिटांत राहुल गांधींचा पलटवार; नेमकं काय घडलं?’
2

Rahul Gandhi On PM Modi Post: ‘मध्यरात्रीचा Video… अन् 70 मिनिटांत राहुल गांधींचा पलटवार; नेमकं काय घडलं?’

राहुल गांधींच्या घराबाहेर वातावरण पुन्हा तापलं; पोलिसांनी रोखली खासदारांची बस अन्… पहा व्हिडियो
3

राहुल गांधींच्या घराबाहेर वातावरण पुन्हा तापलं; पोलिसांनी रोखली खासदारांची बस अन्… पहा व्हिडियो

पीएम हाऊसनंतर राहुल गांधींचा नवा डाव! १२० खासदारांसह उतरले रस्त्यावर; म्हणाले, ‘मोदी सरकार लोकशाहीची हत्या करतंय’
4

पीएम हाऊसनंतर राहुल गांधींचा नवा डाव! १२० खासदारांसह उतरले रस्त्यावर; म्हणाले, ‘मोदी सरकार लोकशाहीची हत्या करतंय’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.