Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Inflation Rate: गेल्या १२ वर्षांत जगणे ६० ते ७० टक्क्यांनी महागले; गरिबीविरुद्धची प्रगती धोक्यात

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणाऱ्या इंधन आणि घरगुती गॅसच्या किमतीतही अशीच मोठी वाढ झाली आहे. २०१३ मध्ये अवघ्या ३९५ रुपयांना मिळणारा एलपीजी (LPG) सिलिंडर आता ९३९ रुपयांना मिळत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 18, 2026 | 02:26 PM
PM Modi, Inflation, Middle Class Crisis,

PM Modi, Inflation, Middle Class Crisis,

Follow Us
Follow Us:
  • गेल्या १२ वर्षांतील (२०१४ ते २०२६) आकडेवारीनुसार, देशात किरकोळ महागाईचा सरासरी दर ५.१% राहिला असून, जीवनावश्यक वस्तू आणि सेवा तब्बल ६०% ते ७०% महागल्या आहेत.
  • या आर्थिक कालखंडात देशात मोठी आर्थिक विषमता समोर आली असून, २०१४ मध्ये देशातील अब्जाधीशांची संख्या जी ५६ होती, ती २०२६ मध्ये वाढून थेट ३०८ वर पोहोचली आहे.
  • गेल्या १० वर्षांत भारतातील सामान्य माणसाचा मासिक घरगुती खर्च सुमारे अडीच पटीने वाढला आहे.
 

India Inflation Rate 12 Years: नेदरलँडमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध आणि जगासमोरील इतर आव्हानांचा संदर्भ देत आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा दिला. ते म्हणाले की, जगातील सातत्याने वाढणारी संकटे त्वरित थांबवली गेली नाहीत, तर गरिबीविरुद्ध दशकांच्या कठोर परिश्रमाने मिळवलेली प्रगती गंभीर धोक्यात येईल. याचा एक अर्थ असाही होतो की भारतातून अजूनही गरिबीचे पूर्णपणे निर्मूलन झालेले नाही, तसेच मध्यमवर्गीयांचे संकट आगामी काळात अधिक वाढणार आहे. त्यांच्या या विधानामुळे भारतातील गरिबी निर्मूलन, महागाई आणि आकडेवारीचे गुंतागुंतीचे जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

भारतात गेल्या १२ वर्षात किरकोळ महागाईचा सरासरी दर सुमारे ५.११० राहिला आहे. या काळात एकूण संचयी किंमत वाढ सुमारे ६०% ते ७०% च्या दरम्यान झाली आहे. याचा अर्थ असा की, ज्या आवश्यक वस्तू किंवा सेवांसाठी २०१४ मध्ये तुम्हाला १०० रुपये मोजावे लागत होते, त्यासाठी २०२६ मध्ये सुमारे १६० ते १७० रुपये खर्च करावे लागत आहेत. विशेष म्हणजे, ही परिस्थिती तेव्हा आहे जेव्हा भारतातील अब्जाधीशांची संख्या २०१४ मधील ५६ वरून आज ३०८ झाली आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, अखेर शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

गरिबीचे वेगवेगळे निकष

जागतिक बँकेच्या ताज्या अंदाजानुसार, भारतात अत्यंत गरिबीत (दररोज २.१५ डॉलर्सपेक्षा कमी) जगणाऱ्यांचे प्रमाण घटून सुमारे ५.३% (७.५) कोटी) झाले आहे.

बहुआयामी गरिवी निर्देशांकानुसार भारतातील सुमारे १५.५ टक्के लोकसंख्या बहुआयामीदृष्ट्‌या गरीब आहे, हा निर्देशांक केवळ उत्पन्नच नाही, तर आरोग्य शिक्षण आणि जीवनमानातील उणिवा देखील मोजती.

सुमारे २८.१ टक्के लोकसंख्या (जवळपास ३७.८ कोटी लोक) निम्न मध्यम उत्पन्न गटात येते, म्हणजेच त्यांचे दैनंदिन उत्पन्न ३.६५ डॉलर्सच्या मर्यादित आहे.

की देशातील सुमारे ८१.३५ कोटी लोकाना आजही मोफत रेशन मिळत आहे. गरिबी दूर करण्याचे निकष आणि ही मोफत रेशन व्यवस्था स्वतःच चरेच काही सांगून जाते.

निम्न उत्पन्न गटाचा संघर्ष संपेना श्रीमंत वर्गाचे

उत्पन्न आणि संपतीत सातत्याने वाढ होत असताना निम्न उत्पन्न गट अजूनही संघर्षांत जगत आहे. भारतात वरचे १०% लोक एकूण राष्ट्रीय उत्पन्नाव्या ५८% कमावतात, तर खालच्या ५०% लोकांना केवळ १५% उत्पन्न मिळते. संपतीमधील ही असमानता आणखीनच जास्त आहे. सर्वात श्रीमंत १०% लोकांकडे देशातील एकूण संपतीचा ६५% हिस्सा, तर सर्वांत वरच्या केवळ १% लोकांकडे जवळपास ४०% संपत्ती एकवटलेली आहे.

IMD Rain Alert: ‘या’ दिवशी केरळमध्ये धडकणार मान्सून; उष्णतेपासून दिलासा मिळणार

मासिक घरगुती खर्च अडीच पटीने वाढला

गेल्या १० वर्षांत भारतातील सामान्य माणसाचा मासिक घरगुती खर्च सुमारे अडीच पटीने वाढला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जर १० वर्षांपूर्वी एखाद्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च २०,००० रुपये होता, तर महागाईमुळे आज तीच जीवनशैली राखण्यासाठी दरमहा सुमारे ५०,००० रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे. स्वयंपाकचर, इंधन वाहतूक, शिक्षण आणि वैद्यकीय खर्च अनेक पटीने वाढला आहे, मात्र त्या प्रमाणात उत्पन्न वाढलेले नाहीं, जर आज तुमचे मासिक बजेट ४०,००० रुपये असेल आणि महागाईचा दर वार्षिक ६% वे ७% राहिला, तर ठीक १० वर्षांनंतर याच गरजा पूर्ण करण्यासाठी दरमहा सुमारे ८०,००० रुपये खर्च करावे लागतील.

२०१३ ते २०२६ दरम्यानची महागाई आणि किंमतींची तुलना

गेल्या १३ वर्षांत जीवनावश्यक वस्तू आणि मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. २०१३ मध्ये सोने प्रति तोळा २७,००० रुपये होते, ते २०२६ मध्ये तब्बल १,४०,००० रुपयांवर पोहोचले आहे. याच काळात चांदी प्रति किलो ३४,००० रुपयांवरून थेट २,७४,००० रुपयांवर गेली आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणाऱ्या इंधन आणि घरगुती गॅसच्या किमतीतही अशीच मोठी वाढ झाली आहे. २०१३ मध्ये अवघ्या ३९५ रुपयांना मिळणारा एलपीजी (LPG) सिलिंडर आता ९३९ रुपयांना मिळत आहे. याशिवाय, २०१३ मध्ये ५५ रुपये प्रति लीटर असणारे पेट्रोल २०२६ मध्ये ५०७ रुपयांवर पोहोचले आहे, तर २०१३ मध्ये डिझेलची किंमत ९५ रुपये प्रति लीटर इतकी नोंदवली गेली होती. एकंदरीत, या सर्वच घटकांमध्ये गेल्या काही वर्षांत ऐतिहासिक दरवाढ झाली असल्याचे दिसून येते.

 

 

 

 

 

Web Title: Cost of living surges by 70 in 12 years india inflation rate 12 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • Inflation
  • PM Modi

संबंधित बातम्या

India Seychelles: PM Modi रचणार इतिहास, सेशेल्सला पोहचले; 3 दिवसांचा दौरा ठरणार खास
1

India Seychelles: PM Modi रचणार इतिहास, सेशेल्सला पोहचले; 3 दिवसांचा दौरा ठरणार खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.