Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Inflation Data : 42 महिन्यांचा रेकॉर्ड तोडला, महागाईचा महा-विस्फोट; एप्रिलमध्ये तब्बल ‘इतक्या’वर पोहोचला आकडा

एप्रिल २०२६ मध्ये, देशाचा घाऊक महागाई दर किंवा WPI वाढून ८.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. याउलट, मार्च महिन्यात हाच आकडा ३.८८ टक्के इतका होता. गेल्या ४२ महिन्यांमध्ये म्हणजेच साधारणपणे साडेतीन वर्षांच्या कालावधीत नोंदवला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 14, 2026 | 02:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • देशातील महागाईचा दबाव वेगाने वाढत
  • एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर ८.३० टक्क्यांवर
  • Fuel & Power सेक्टरने बिघडवला खेळ
Inflation Data : देशातील महागाईचा दबाव वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. जागतिक ठिकाणची परिस्थिती आणि त्यामुळे होणारा परिणाम पाहता महागाईचा भडका उडाला आहे. भारतामध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते. एप्रिल २०२६ मध्ये, देशाचा घाऊक महागाई दर किंवा WPI वाढून ८.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. याउलट, मार्च महिन्यात हाच आकडा ३.८८ टक्के इतका होता. गेल्या ४२ महिन्यांमध्ये म्हणजेच साधारणपणे साडेतीन वर्षांच्या कालावधीत नोंदवली गेलेली ही महागाईची सर्वोच्च पातळी मानली जात आहे; ज्यामुळे नजीकच्या भविष्यात दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतींवर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे. नेमका कसा बदल होत गेला? जाणून घेऊयात.

EPFO Change Update: आता फटाफट होईल काम… 7 कोटी लोकांसाठी आनंदाची बातमी, EPFO करणार ‘हा’ मोठा बदल

Fuel & Power सेक्टरने बिघडवला खेळ

या महागाईवाढीमध्ये इंधन क्षेत्राचा वाटा सर्वाधिक राहिला आहे. ‘इंधन आणि ऊर्जा’ म्हणजेच Fuel & Power या श्रेणीतील महागाई मार्च महिन्यातील १.०५ टक्क्यांवरून गगनाला भिडत आहेत. एप्रिलमध्ये २४.७१ टक्क्यांवर पोहोचली. दरम्यान, कच्च्या तेलाच्या म्हणजेच Crude Oil घाऊक महागाईची नोंद ८८ टक्क्यांहून अधिक करण्यात आली.

पेट्रोलच्या किमतींमध्ये ३२.४० टक्के आणि डिझेलच्या किमतींमध्ये २५.१९ टक्के झालेली वाढ यामुळे महागाईचा दबाव आणखीच तीव्र झाला आहे. तसेच, LPG च्या किमतींमध्येही १०.९२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. ही आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की, सामान्य जनतेवर महागाईचे ओझे सातत्याने वाढतच चालले आहे.

आकडेवारीच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थिती

इराणमधील संकट आणि आखाती देशांमधील वाढता तणाव यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ, या आकडेवारीमध्ये थेट प्रतिबिंबित झाली आहे. ‘प्राथमिक वस्तू’ गटातील महागाई मार्च महिन्यातील ६.३६ टक्क्यांवरून वाढून एप्रिलमध्ये ९.१७ टक्क्यांवर पोहोचली. त्याचप्रमाणे, ‘उत्पादित वस्तू’ गटातील महागाई ३.३९ टक्क्यांवरून वाढून ४.६२ टक्क्यांवर गेली आहे.

एक बाब दिलासादायक

‘कोअर WPI’ जो अन्न आणि इंधन वगळता इतर सर्व वस्तूंच्या महागाईचे मोजमाप करतो. तो ५ टक्क्यांवर पोहोचला असून, हा गेल्या ४३ महिन्यांतील उच्चांक ठरला आहे. मार्च महिन्यात हा आकडा ३.७ टक्के इतका होता. मात्र, यातील एक दिलासादायक बाब म्हणजे, अन्नपदार्थ लक्षणीयरीत्या महाग झालेले नाहीत; अन्नधान्यांच्या महागाईत केवळ किरकोळ वाढ झाली असून, ती मार्चमधील १.८५ टक्क्यांवरून २.३१ टक्क्यांवर गेली आहे. शिवाय, कांदे आणि बटाटे यांच्या घाऊक किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही बऱ्याच कमी आहेत. DPIIT च्या माहितीनुसार, मे महिन्याची WPI आकडेवारी १५ जून रोजी जाहीर केली जाणार आहे.

MSP Hike : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारकडून 14 खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ

Web Title: India inflation data april breaks 42 month record retail inflation surge see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Diesel Petrol Price
  • Indian Inflation
  • Inflation
  • Inflation Increases
  • Inflation News
  • Petrol Prices
  • Retail Inflation

संबंधित बातम्या

120 डॉलरवरुन थेट 76 डॉलरवर… कच्च्या तेलाच्या किमती धडाम; भारतातील पेट्रोल आणि डिझेल कधी स्वस्त होणार ?
1

120 डॉलरवरुन थेट 76 डॉलरवर… कच्च्या तेलाच्या किमती धडाम; भारतातील पेट्रोल आणि डिझेल कधी स्वस्त होणार ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.