दसऱ्याच्या निमित्ताने इंदौरमध्ये शूर्पणखा दहन केले जाणार असून 11 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या महिलांचे फोटो जाळण्यात येणार आहे (फोटो सौजन्य - AI Generated)
Shurpanakha Dahan : मध्यप्रदेश : नवरौत्सावाला सुरुवात होणार असून सर्वत्र जोरदार तयारी केली जात आहे. संपूर्ण देशामध्ये दसरा सण देखील मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. या दिवशी शस्त्रांची आणि पुस्तकांची पुजा केली जाते. त्याचबरोबर रावण दहन देखील केले आहे. विजयोत्सव असणारा हा सण संकटावर मात करुन विजय साजरा करण्याचा मानला जातो. दसऱ्याच्या निमित्ताने उत्तर भारतामध्ये खास करुन रावणाचे दहन केले जाते. पण आता मध्य प्रदेशमधील इंदौरमध्ये चक्क शूर्पणखा दहन होणार आहे.
रावण दहनानंतर आता संपूर्ण देशामध्ये शूर्पणखा दहन केले जाणार आहे. वाईट प्रवृत्ती असलेल्या रावणानंतर आता कलयुगामध्ये शूर्पणखेचीही दहन होणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही शूर्पणखा रावणाप्रमाणे 11 तोंडाची असणार आहे. कलयुगातील शूर्पणखेला आजच्या काळातील सोनम रघुवंशी आणि मेरठची मुस्कान यांचे चेहरे लावण्यात येणार आहेत. यामुळे या अनोख्या दहनाची संपूर्ण देशामध्ये चर्चा सुरु आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मध्य प्रदेशमधील इंदौरमधील दसऱ्याला महालक्ष्मी मेळा मैदानावर हे शूर्पणखा दहन होणार आहे. यामध्ये महिला गुन्हेगारांचे पुतळे जाळले जातील. रावणाच्या 10 चेहऱ्यांऐवजी, त्यांच्या पतींची किंवा निष्पाप मुलांची निर्घृण हत्या करणाऱ्या 11 महिला गुन्हेगारांचे पुतळे जाळले जाणार आहेत.
सामाजिक संदेश देण्यासाठी हे अनोखे दहन
पौरूष संघटनेचे अध्यक्ष अशोक दशोरा यांनी सांगितले की, हा मुद्दा रावणाचा नसून दुष्टाईच्या अंताचा आहे. म्हणून, यावेळी रावण जाळण्याऐवजी शूर्पणखा जाळली जाईल. ज्या महिला आपल्या पतींची हत्या करतात त्या समाजातील सर्वात मोठ्या दुष्ट आहेत. हा संदेश देण्यासाठी ११ मुंडक्यांचा पुतळा तयार केला जात आहे. यामध्ये पतीच्या हत्येचा कट रचणारी सोनम रघुवंशी हिच्यासह इतर महिला गुन्हेगार असणार आहे.
इंदौरमध्ये दसऱ्याच्या निमित्ताने शूर्पणखा दहन केले जाणार आहे.
शूर्पणखा दहनामध्ये राजा रघुवंशी यांची हत्या करणारी सोनम रघुवंशी, निळ्या ड्रममध्ये पतीची हत्या करणारी मेरठची मुस्कान, राजस्थानची हर्षा, जौनपूरची निकिता सिंघानिया, दिल्लीची सुष्मिता, मेरठची रविता, फिरोजाबादची शशी, बेंगळुरूची सुचना सेठ, देवासची हंसा, मुंबईची चमन उर्फ गुडिया आणि औरैयाची प्रियांका यांचे चेहरे असणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६:३० वाजता महालक्ष्मी मेळा मैदानावर शूर्पणखा पुतळा दहन समारंभ होणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजा रघुवंशीच्या कुटुंबाला आमंत्रण
या कार्यक्रमाचा भाग म्हणून शूर्पणखा आणि तिच्या सैन्याची मिरवणूक देखील काढली जाईल. जाळण्याची वेळ संध्याकाळी ६:३० वाजता निश्चित करण्यात आली आहे. राजा रघुवंशीच्या कुटुंबालाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.