Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिसोदिया, जैन यांच्या राजीनाम्यानंतर ‘आप’च्या हालचाली वाढल्या, केजरीवालांनी बोलावली आमदार-नगरसेवकांची तातडीची बैठक

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया (Manish Sisodia) सध्या अटकेत आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) त्यांची तब्बल 8 तास चौकशी केली होती. मद्य धोरण घोटाळ्यात नाव आल्यानंतर सिसोदिया यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यासोबत सत्येंद्र जैन यांनीही राजीनामा दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 01, 2023 | 03:45 PM
'अरविंद केजरीवाल यांची सीबीआयने केलेली अटक योग्य'; कोर्टाने फेटाळली जामीन याचिका

'अरविंद केजरीवाल यांची सीबीआयने केलेली अटक योग्य'; कोर्टाने फेटाळली जामीन याचिका

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया (Manish Sisodia) सध्या अटकेत आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) त्यांची तब्बल 8 तास चौकशी केली होती. मद्य धोरण घोटाळ्यात नाव आल्यानंतर सिसोदिया यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यासोबत सत्येंद्र जैन यांनीही राजीनामा दिला. पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी राजीनामा मंजूर केला. त्यानंतर आता दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आपच्या आमदार-नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे.

सिसोदिया यांचे नाव घोटाळ्यात आल्यानंतर भाजप-काँग्रेसकडून मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर दबाव वाढत होता. त्यानंतर तुरुंगात असलेल्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचे आमदार आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांची नावे मंत्रिमंडळातील नवीन नियुक्त्यांसाठी नायब राज्यपालांकडे पाठवली आहेत. हे दोन्ही नेते केजरीवाल मंत्रिमंडळात मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांची जागा घेतील, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आमदार-नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आम आदमी पक्षाचे आमदार आणि नगरसेवक सहभागी होणार आहेत. सिसोदिया यांच्या अटकेमुळे भविष्यातील योजनांवर आज चर्चा होणार आहे.

2024 मध्ये लोकसभा निवडणूक

2024 च्या लोकसभा निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत. हे दोन्ही बडे नेते दीर्घकाळ तुरुंगात राहिले तर केजरीवाल यांना वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता केजरीवाल यांनी ही बैठक बोलावली असेल, असे म्हटले जात आहे.

कैलाश गेहलोत यांच्याकडे अर्थ खाते

कैलाश गेहलोत यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले असून, अशा परिस्थितीत ते अर्थसंकल्प सादर करतील. केजरीवाल यांनी ही तत्काळ अडचण दूर केली असली तरी असे अनेक अडथळे मार्गात येणार आहेत. नायब राज्यपालांनी 2 नवीन मंत्र्यांचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. एक-दोन दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे सांगितले जात आहे.

Web Title: Delhi cm arvind kejriwal called an urgent meeting of the mlas corporators in delhi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2023 | 03:45 PM

Topics:  

  • Arvind kejriwal
  • CBI
  • Manish Sisodia
  • political news

संबंधित बातम्या

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?
1

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?

Chadha Demands Paternity Leave : नवजात बाळाला सांभाळण्याची वडीलांचीही जबाबदारी; राघव चड्ढांनी केली पितृत्व सुट्टीची मागणी
2

Chadha Demands Paternity Leave : नवजात बाळाला सांभाळण्याची वडीलांचीही जबाबदारी; राघव चड्ढांनी केली पितृत्व सुट्टीची मागणी

विरोधकांच्या टीकेनंतर सोडले मौन; अशोक खरात प्रकरणावर अखेर मंत्री आदिती तटकरेंची प्रतिक्रिया
3

विरोधकांच्या टीकेनंतर सोडले मौन; अशोक खरात प्रकरणावर अखेर मंत्री आदिती तटकरेंची प्रतिक्रिया

Satara News: सत्ता परिवर्तनाची चळवळ तळागाळात राबवली पाहिजे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा साताऱ्यात पवित्रा
4

Satara News: सत्ता परिवर्तनाची चळवळ तळागाळात राबवली पाहिजे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा साताऱ्यात पवित्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.