रुग्णालयाच्या शवगाराबाहेर मालकाची वाट पाहणारा कुत्रा, चार महिन्यापासून शोधतोय मालकाला

हा कुत्रा एका रुग्णासोबत दिसल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कुत्र्याला समोरच्या दारातून शवगारात नेले जात असल्याचे दिसले.

  मालकाचं निधन झाल्यानंतर कधी कधी तासनतास तर कधी अनेक दिवस आपल्या मालकाची वाट पाहत बसणरा कुत्रा (Dog) आपण चित्रपटांमध्ये अनेकदा पाहिला आहे. पण आता अशीच एक भावनिक घटना केरळच्या कन्नूरमधून समोर आली आहे. येथे एक कुत्रा गेल्या 4 महिन्यांपासून आपल्या मृत मालकाची रुग्णालयाच्या शवागारासमोर वाट पाहत आहे की तो बाहेर येईल आणि त्याला आपल्यासोबत घरी घेऊन जाईल.

  नेमकं प्रकरण काय?

  केरळमधील कन्नूरमध्ये एक कुत्रा त्याच्या मालकाचा मृत्यू झाल्यापासून रुग्णालयाच्या शवागाराबाहेर येऊन थांबतो. कदाचित त्याला माहित नसेल की त्याचे मालक ज्याची वाट पाहतोय तो आता या जगात नाही. मात्र, हा कुत्रा आता सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.

  मालकाला शोधतोय कुत्रा

  केरळमधील कन्नूर जिल्हा रुग्णालयाच्या शवागाराबाहेर एक कुत्रा गेल्या 4 महिन्यांपासून येतो. रुग्णालयात येणाऱ्या अनेक लोकांना हा कुत्रा तिथे बसलेला दिसतो, जणू काही तो 4 महिन्यांपासून त्याच्या मालकाची वाट पाहत आहे. मात्र,  कुत्र्याबद्दल कोणालाही माहिती नाही. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील अधिकारीही कुत्र्याच्या मालकाची ओळख पटवू शकलेले नाहीत.

  हा कुत्रा एका रुग्णासोबत दिसल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कुत्र्याला समोरच्या दारातून शवगारात नेले जात असल्याचे दिसले. नंतर सर्व मृतदेहांप्रमाणेच त्याच्या मालकाचा मृतदेहही दुसऱ्या दारातून बाहेर काढण्यात आला. पण हा प्रामाणिक आणि निष्ठावान कुत्रा आजही या आशेने वाट पाहत आहे की, त्याचा मालक या दरवाजातून बाहेर येईल की जिथून त्याचा मृतदेह आत नेण्यात आला होता.

   

  दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, त्याने कुत्र्याचे नाव रामू ठेवले आहे आणि आता हा रामू सर्व कर्मचाऱ्यांचा मित्र बनला आहे आणि त्यांच्यासोबत राहत आहे. आता रामूची ही कहाणी जो कोणी ऐकेल त्याच्या डोळ्यात पाणी आले. या कुत्र्याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण याला माणसाचा सोबती म्हणत आहेत तर काहीजण याला खरी निष्ठा म्हणत आहेत. जिथे आज माणूस आपल्या गरज आणि स्वार्थासाठी आपल्या प्रियजनांकडे पाठ फिरवतो. तिथे हा कुत्रा अजूनही आपल्या मालकाची वाट पाहताना दिसतोय.