Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

CJP Replies Gyanesh Kumar: दोन्ही निवडणूक आयुक्तांनी काही महत्त्वाचे निर्णय त्यांच्या माहितीशिवाय संपूर्ण निवडणूक आयोगाच्या नावाने घेतले जात असल्याचा दावा केला. यातील काही निर्णय ‘अनधिकृत आणि बेकायदेशीर’ असल्याचेही त्यांनी म्हटल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 24, 2026 | 01:10 PM
Gyanesh Kumar, Election Commission, National News,

Gyanesh Kumar, Election Commission, National News,

Follow Us
Follow Us:
  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी
  • ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार २ आयुक्तांचे १० महिन्यांत तब्बल १४ वेळा औपचारिक आक्षेप
  • काही निर्णय इतर आयुक्तांच्या माहितीशिवाय ‘अनधिकृत व बेकायदेशीर’रीत्या घेतल्याचा दावा
Demand To Remove CEC Gyanesh Kumar : देशभरातील विरोधी पक्षांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांना तातडीने पदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
इंग्रजी वृत्तसंस्था‘इंडियन एक्स्प्रेस’ने निवडणूक आयोगासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या वृत्तानुसार, गेल्या १० महिन्यांत तीन निवडणूक आयुक्तांपैकी सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी किमान १४ वेळा औपचारिकरीत्या आक्षेप नोंदवले होते. त्यानंतर देशभरातून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संतापाची भावना व्यक्त केली जातआहे.

दोन्ही निवडणूक आयुक्तांनी काही महत्त्वाचे निर्णय त्यांच्या माहितीशिवाय संपूर्ण निवडणूक आयोगाच्या नावाने घेतले जात असल्याचा दावा केला. यातील काही निर्णय ‘अनधिकृत आणि बेकायदेशीर’ असल्याचेही त्यांनी म्हटल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीने (CJP) गुरुवारी (२४ सप्टेंबर) नियोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ‘भारतीय लोकशाहीचे अपहरण’ या विषयावर पक्षाचे नेतृत्व दुपारी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या

निवडणूक आयोगाचे आरोपांवर स्पष्टीकरण

या आरोपांवर भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी स्पष्टीकरण दिले. आयोगाचे सर्व कामकाज कायदे आणि आयोगाच्या निर्देशांनुसारच झाले असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. गेल्या १० महिन्यांत मंजूर झालेल्या प्रस्तावांची संख्या, घेतलेले निर्णय, जारी केलेले निर्देश आणि विविध उपक्रमांची मोठी संख्या लक्षात न घेता केवळ काही अंतर्गत नोंदी किंवा टिप्पण्यांवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘चित्राची केवळ एक बाजू दाखवणे’ असल्याचे आयोगाने म्हटले.

‘निवडणूक आयुक्तांमधील मतभेद ही लोकशाहीची खूण’ – भाजप

दरम्यान, भाजपनेही विरोधकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. अधिकृत चर्चेदरम्यान तीन निवडणूक आयुक्तांची वेगवेगळी मते असल्याच्या बातम्या समोर येणे, हे निवडणूक आयोग लोकशाही पद्धतीने काम करत असल्याचे दर्शवते, असा दावा भाजपने केला. यामुळे निवडणूक आयोग ‘हुकूमशाही पद्धतीने’ काम करत असल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा ठरत असल्याचेही भाजपने म्हटले.

भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेत पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले की, अधिकृत चर्चांमध्ये निवडणूक आयुक्तांनी वेगवेगळी मते मांडल्याच्या बातम्या या ‘खऱ्या लोकशाहीची निशाणी’ असल्याचे त्यांनी म्हटले.

 

Web Title: Election commission internal dispute cjp press conference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • CJP
  • Election Commission
  • national news
  • political news

संबंधित बातम्या

Gyanesh Kumar Election Commission Dispute: ज्ञानेश कुमारांचा कर्ताकरविता कोण? राज ठाकरेंनी तोफ डागली
1

Gyanesh Kumar Election Commission Dispute: ज्ञानेश कुमारांचा कर्ताकरविता कोण? राज ठाकरेंनी तोफ डागली

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

ECI Appointment Case Supreme Court: निवडणूक आयुक्त नियुक्तीचा निर्णय ५ न्यायाधीशांच्या संविधान पीठाकडे जाणार?
3

ECI Appointment Case Supreme Court: निवडणूक आयुक्त नियुक्तीचा निर्णय ५ न्यायाधीशांच्या संविधान पीठाकडे जाणार?

ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे स्पष्टीकरण!
4

ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे स्पष्टीकरण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.