पुणे – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसंदर्भात मुख्य निवडणूक (Chief Election Commissioner) आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) मोठे वक्तव्य केले आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation One Election) साठी निवडणुकीसाठी निवडणूक आयोग तयार आहे. आता या संदर्भातील अंतिम निर्णय सरकारने घ्यावा, असे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राजीव कुमार म्हणाले, लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा (Vidhan Sabha) निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे नाही. वन नेशन, वन इलेक्शन याविषयी निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनाबाबत ते म्हणाले की, यामध्ये अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे याचा अंतिम निर्णय हा सरकारने घ्यावा.
राजीव कुमार म्हणाले, पुण्यामध्ये मतदानाची टक्केवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी होताना मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी मतदानाविषयी जनजागृती करुन पात्र कामगारांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले. मतदार जागृती मंचाच्या प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत भारत निवडणूक आयोग सकारात्मक विचार करेल. दरम्यान, तृतीयपंथी समुदायातील मतदारांशी देखील निवडणूक आयोगाने संवाद साधला.