दिल्ली पोलिसांनी रविवारी (Delhi Police) कुस्तीपटू साक्षी मलिक, (sakshi malik ) विनेश फोगट (vinesh phogat ) आणि बजरंग पुनिया (bajrang punia) तसेच आयोजक आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध दंगल आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल एफआयआर नोंदवला आहे. तत्पूर्वी, रविवारी कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते जेव्हा त्यांनी सुरक्षा व्यवस्था तोडून म संसदेच्या नवीन इमारतीकडे जाण्याचा प्रयत्न केला होता.
[read_also content=”मणिपूर पुन्हा पेटलं; पोलिसासह पाच जणांचा मृत्यू,बंडखोर संघटना मोठ्या हल्ल्याच्या तयारीत https://www.navarashtra.com/india/five-people-died-including-the-police-in-manipur-violence-nrps-405917.html”]
या प्रकरणाबाबत विनेश फोगटने नाराजी व्यक्त केली असून म्हण्टलंय की, कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात एफआयआर नोंदवायला सात दिवस लागले, पण ‘शांततेने’ आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवायला सात तासही लागले नाहीत. घरी परत जाणे हा पर्याय नाही. मी बाकीच्या पैलवानांना भेटेन आणि पुढे काय करायचे ते आम्ही ठरवू.
कलम 353 आणि पीडीपीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदल्या दिवशी पोलीस आणि पैलवानांमध्ये झालेल्या दंगलीत 700 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. आंदोलक कुस्तीपटूंसह 109 जणांना जंतरमंतरवर ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्यांना रात्री उशिरा सोडण्यात आले. दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या ३६ दिवसांपासून संपूर्ण देशाच्या नजरा खिळल्या होत्या. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत शांतता होती. सायंकाळी सहा वाजल्यानंतर येथे पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशिवाय एकही व्यक्ती दिसत नव्हती, आजूबाजूला फक्त बॅरिकेडिंग दिसते. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
पैलवानांच्या समर्थनार्थ होणाऱ्या महिला खाप पंचायतीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासून दिल्लीच्या सीमांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हरियाणा-दिल्ली सीमेवर आणि उत्तर प्रदेश-दिल्ली सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. त्याचवेळी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स, डंपर, बसेस, क्रेन आणि मधोमध काँक्रिटचे मोठे दगड लावून रास्ता रोको केला होता.
बाहेरील दिल्लीच्या सीमेला लागून असलेल्या दिल्लीच्या जिल्ह्यांच्या पोलिस उपायुक्तांनी सांगितले की येथे कोणालाही ताब्यात घेण्यात आले नाही. त्याचवेळी गाझीपूर सीमेवर जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ जंतरमंतरवर येणाऱ्या खाप समर्थकांना हरियाणाच्या काही सीमेवर आधीच रोखण्यात आले होते.