अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा उद्धाटन सोहळा (Ram Mandir Inauguration) काही दिवसांवर आला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नंरेद्र मोदींसोबत अनेक बडे नेत उपस्थित राहणारा आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर भंक्तही येणार. भक्तांची होणारी गर्दी पाहता भारतीय रेल्वेही (Indian Railway) भक्तांसाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतरच्या पहिल्या 100 दिवसांत राम भक्तांची दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वेने देशाच्या विविध भागांतून अयोध्येला 1,000 हून अधिक गाड्या चालवणर आहे. या ट्रेन 19 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहेत.
[read_also content=”संसदेतील सुरक्षा भंगप्रकरणी मोठी अपडेट, सहावा आरोपी महेश कुमावतही अटक https://www.navarashtra.com/india/update-in-parliament-security-breach-case-accused-mahesh-kumawat-also-arrested-by-delhi-police-nrps-489491.html”]
प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केल्यानंतरच्या एका दिवसानंतर 23 जानेवारी 2024 रोजी मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. ही बाब लक्षात घेता भारतीय रेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, कोलकाता, नागपूर, लखनौ आणि जम्मूसह अनेक प्रमुख शहरांमधून अयोध्येला जाणाऱ्या विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.
सात हजार जणांना देण्यात आलं आमंत्रण
अयोध्येतील नव्या भव्य दिव्य राम मंदिरा रामलल्लांच्या अभिषेक प्रसंगी देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे. कलाकार, साहित्यिक, धार्मिक नेते आणि क्रीडा जगतातील मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. या प्राण प्रतिष्ठेसाठी 7 हजार जणांना आमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 22 जानेवारीला अयोध्येतील नव्या राम मंदिराचे उद्घाटन (Ayodhya Ram Lalla New Grand Teample) करतील आणि त्यांच्या हस्ते रामलालाचा अभिषेकही केला जाईल.






