Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priyanka Gandhi Criticized Mohan Bhagwat: जेन-झी ला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; प्रियांका गांधींचा मोहन भागवतांवर निशाणा

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी मुंबईत जनरेशन-झेड आणि जनरेशन-अल्फा यांच्याशी एक तास संवाद साधला. ते म्हणाले की, जनरेशन-झेड आणि जनरेशन-अल्फा या जुन्या पिढीपेक्षा अधिक देशभक्त आणि प्रामाणिक आहेत. आपण त्यांचे ऐकले पाहिजे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 07, 2026 | 01:34 PM
Priyanka Gandhi, Mohan Bhagwat, RSS, Congress, National News,

Priyanka Gandhi, Mohan Bhagwat, RSS, Congress, National News,

Follow Us
Follow Us:
  • आजची तरुण पिढी प्रश्न विचारणारी आहे; त्यांना उत्तरे आणि प्रेम हवे आहे. आंदोलने करणे संविधानाने मान्य केले आहे.
  • जनरेशन-झेडला प्रमाणपत्राची गरज नाही; गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट कारवाई करण्याची गरज.
  • सरकारवर संघाचे नियंत्रण असताना विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या लाठीचार्ज आणि पेलेट गनवर मौन का?
 

Priyanka Gandhi Criticized Mohan Bhagwat: जनरेशन झेडला आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्याकडून कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही. जर त्यांना खरोखरच जनरेशन झेडची काळजी असेल, तर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना राजीनामा देण्यास सांगावे. नाहीतर, अमित शाहांनी किमान संसदेत येऊन विद्यार्थ्यांची माफी मागावी.” अशा शब्दांत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांवर निशाणा साधला आहे.

मोहन भागवत यांनी काल (6 ऑगस्ट) यांनी जेन-झीं सोबत संवाद साधला. या संवादानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा आरएसएस आणि भाजपला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. मोहन भावतांच्या जेन-झी संवादावर काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल म्हणाले, “सरकारवर आरएसएसचे नियंत्रण आहे. जर त्यांना खरोखरच विद्यार्थ्यांची काळजी असेल, तर त्यांनी त्यांच्यावरील अत्याचारांचा निषेध केला पाहिजे. विद्यार्थी पेपरफुटी प्रकरणी जबाबदारीची मागणी करत असताना त्यांच्यावर पेलेट गनचा वापर करण्यात आला, या मुद्द्यावर भागवत मौन का आहेत असा सवाल उपस्थित करत हा सगळा निव्वळ देखावा आहे.” अशी टिका वेणुगोपाल यांनी केली.

Sadhus Protest Rahul Gandhi Residence: राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर साधू-संतांचे तीव्र आंदोलन

मोहन भागवत काय म्हणाले?

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी मुंबईत जनरेशन-झेड आणि जनरेशन-अल्फा यांच्याशी एक तास संवाद साधला. ते म्हणाले की, जनरेशन-झेड आणि जनरेशन-अल्फा या जुन्या पिढीपेक्षा अधिक देशभक्त आणि प्रामाणिक आहेत. आपण त्यांचे ऐकले पाहिजे. त्यांच्याशी संवादाचा अभाव होता, म्हणूनच दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन झाले.”

जेव्हा आम्ही जनरेशन-झेड होतो, तेव्हा आम्ही आमच्या वडीलधाऱ्यांचे म्हणणे ऐकायचो आणि त्यावर प्रश्न विचारत नव्हतो. आजची जनरेशन-झेड प्रश्न विचारते. त्यांना उत्तरे आणि प्रेम हवे आहे. जनरेशन-झेडने आंदोलन करू नये, असे आम्ही म्हणणार नाही. संविधानात आंदोलनांना परवानगी असल्याचे म्हटले आहे, पण ते कसे करायचे हे आपल्याला पाहावे लागेल. असंही भागवत यांनी नमुद केलं.

Sadhus Protest Rahul Gandhi Residence: राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर साधू-संतांचे तीव्र आंदोलन

आपल्याला हेही विचारात घ्यायला हवे की, जर जनरेशन-झेड जर काही मागण्या करत असेल, तर त्यांना काही समस्या आहेत म्हणून या मागण्या करत आहेत. आंदोलने आमच्या किंवा तुमच्या विरोधात नसावीत, तर ती व्यवस्थेतील सुधारणांसाठी असावीत. जर जनरेशन-झेड आंदोलन करत असेल, तर ते देशद्रोही नाहीत. ते आपलेच लोक आहेत, आपली पुढची पिढी आहे. आपले त्यांच्याशी नाते आहे. त्यांनी आपल्याला समजून घेतले पाहिजे आणि आपण त्यांना समजून घेतले पाहिजे.

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत बोलताना भागवत म्हणाले की, लाठीचार्ज का झालाआणि त्याचे कारण काय होते, हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. त्याचा आढावा घेतल्यानंतर समस्या नेमकी कुठे आहे, हे आपल्याला निश्चित करावे लागेल. मी वर्तमानपत्रात वाचले की यात काही दंगलखोर सामील होते. जर मला जनरेशन-झेडवर आंधळेपणाने विश्वास ठेवावा लागत असेल, तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवू शकेन.

 

Web Title: Priyanka gandhi attacks rss chief mohan bhagwat gen z statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Congress
  • mohan bhagwat
  • national news
  • Priyanka Gandhi
  • RSS

संबंधित बातम्या

Junnar Congress: जुन्नरमध्ये काँग्रेसध्ये अंतर्गत संघर्ष; कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी
1

Junnar Congress: जुन्नरमध्ये काँग्रेसध्ये अंतर्गत संघर्ष; कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी

‘आंदोलन म्हणजे देशद्रोह नाही’; ‘जेन झी’बाबत मोहन भागवतांचे मोठे विधान, शिक्षण व्यवस्थेवरही व्यक्त केली चिंता
2

‘आंदोलन म्हणजे देशद्रोह नाही’; ‘जेन झी’बाबत मोहन भागवतांचे मोठे विधान, शिक्षण व्यवस्थेवरही व्यक्त केली चिंता

RSS सरसंघचालकांचा Gen-Z आणि Gen Alpha शी संवाद ही मलमपट्टी, आधी तरुणाईची माफी मागा अन्…; काँग्रेसचा निशाणा
3

RSS सरसंघचालकांचा Gen-Z आणि Gen Alpha शी संवाद ही मलमपट्टी, आधी तरुणाईची माफी मागा अन्…; काँग्रेसचा निशाणा

‘त्या’ ट्विटवरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार, काँग्रेसला महिला सन्मान शिकवण्याची गरज नाही; लोंढेंचा भाजपवर निशाणा
4

‘त्या’ ट्विटवरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार, काँग्रेसला महिला सन्मान शिकवण्याची गरज नाही; लोंढेंचा भाजपवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.