File Photo : Youth Suicide
सिरोही : राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात (Sirohi Crime) एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये भाजपचे नेते, माजी आमदार टीकमचंद कांत (Tikamchand Kant) यांचे पुत्र सुनीश कांत (Sunish Kant) यांनी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करताना फेसबुक लाईव्ह (Facebook Live) केल्याचेही समोर आले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
सुनीश आणि त्यांची पत्नी पूजा यांच्यामध्ये वाद सुरू होता. या वादामुळे पूजा काही दिवसांपूर्वी पती सुनीशला सोडून निघून गेली होती. त्यातून सुनीश निराश होता. शुक्रवारी रात्री सुनीशने त्याच्या कारमधूनच फेसबुक लाईव्ह केले. गाडीतच त्याच्याकडे पाण्याची बाटली आणि काही पाकिटे होती. या पॅकेटमधून एक गोळी काढली आणि पत्नी पूजाचे नाव घेत रडत ती गोळी खाल्ली. तसेच व्हिडिओमध्ये त्याने पत्नीवर खूप प्रेम असल्याचेही सांगितले होते.
सुनीश हे करत असताना अनेकांनी पाहिले देखील होते. त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला आणि काही तासांनंतर सुनीश त्याच्या बहिणीच्या घरी सापडला.
अत्यवस्थ सुनीशला नेले रुग्णालयात
विष प्राशन केल्यानंतर सुनीश बेशुद्ध झाला. त्याला तातडीने जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे रात्री उशिरा उपचारादरम्यान सुनीशचा मृत्यू झाला. सुनीशच्या मृत्यूची माहिती जिल्ह्यातील लोकांना मिळताच रुग्णालयात मोठी गर्दी होऊ लागली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.