'नरसिंह रावांना ना जमिनीचा एक तुकडा मिळाला ना भारतरत्न'; माजी पंतप्रधानांच्या भावाचे काँग्रेसवर गंभीर आरोप
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं नुकताच निधन झालं. त्यांच्या स्मृतीस्थळासाठी काँग्रेसने राजघाटावर जागेची मागणी केली होती. त्यावरून माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचे भाऊ मनोहर राव यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.’काँग्रेसने २० वर्षे मागे वळून पाहावं आणि त्यांनी त्यांचे नेते पीव्ही नरसिंह राव यांना किती आदर दिला ते पाहावं. काँग्रेसने त्यांना जमिनीचा तुकडाही दिला नाही की साधा पुतळा उभे केला. कॉंग्रेसच्या काळात त्यांना भारतरत्नही मिळालं नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
पीव्ही नरसिंह राव यांच्या अंत्यसंस्कारालाही सोनिया गांधी उपस्थित नव्हत्या. काँग्रेसने नरसिंह राव यांच्यासाठी पक्ष कार्यालयाचं दार कधीही उघडलं नाही. डॉ.मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी भाजप नक्कीच जमीन देईल. काही औपचारिकता आहेत ज्या काँग्रेसने पूर्ण केल्या पाहिजेत. स्मारकासाठी भाजप नक्कीच जमीन देईल. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांची जोडी गुरु-शिष्याची जोडी असल्याचं ते म्हणाले.
मनमोहन राव म्हणाले की, नरसिंह राव यांनी डॉ.मनमोहन सिंग यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. मनमोहन सिंग यांना त्यांच्या कार्यकाळात खूप प्रसिद्धी मिळाली कारण त्यांनी (नरसिंह राव) मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून काम करण्याचं स्वातंत्र्य दिले होते. या काळात मनमोहन सिंग यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं. पण मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांचे गुरू नरसिंह राव यांना काय मिळालं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मनोहर राव पुढे म्हणाले की, मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कावेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान… संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होतं. मात्र नरसिंह राव यांच्या अंत्यसंस्काराला कोणीही हजेरी लावली नाही. ते हैदराबादला आले नसते का? त्यावेळी सोनिया गांधी एआयसीसीच्या अध्यक्षा होत्या. त्यांना हैदराबादला जाता आलं नसतं का? त्या इतर ठिकाणी जायच्या, पण ती इथे आल्या नाहीत.
मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या संवेदना व्यक्त करतो. त्यांचे स्मारक उभारण्यासाठी भाजप जागा देणार आहे. ट्रस्ट स्थापन करण्याची चर्चा आहे. त्यानंतर स्मारकासाठी जमीन दिली जाईल. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारण्यासाठी काँग्रेसला राजघाटाजवळ जमीन हवी होती. तिथेचं अंत्यसंस्कार करून समाधी बांधण्यात यावी, असं ते म्हणाले.