
मागच्या आठवड्यात उच्चांकी दरापेक्षा सोने ५ हजारांनी स्वस्त झाले होते पण अशातच युद्धामुळे सोन्याच्या दरात आठवड्याभरातच पुन्हा ३ हजारांनी वाढ झाली. त्यामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील.
नवी दिल्ली : जागतिकीकरणाच्या काळात कोणत्याही देशात घडणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा परिणाम जगातील इतर देशांवरही होतो. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे झालेल्या नुकसानातून अद्यापही जग सावरले नसताना इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू झाले. इस्रायल आणि गाझामधील युद्धाचा परिणाम आता सोन्या-चांदीच्या बाजारावरही दिसून येण्याची शक्यता आहे.
मागच्या आठवड्यात उच्चांकी दरापेक्षा सोने ५ हजारांनी स्वस्त झाले होते पण अशातच युद्धामुळे सोन्याच्या दरात आठवड्याभरातच पुन्हा ३ हजारांनी वाढ झाली. त्यामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील. अशातच आज सोन्याचा भाव हा ५९ हजारांवर पोहोचला आहे. येत्या सणासुदीच्या काळात ६० हजारांवर पोहोचू शकतो असे देखील म्हटले जात आहे. आजचा सोन्याचा भाव किती हे जाणून घेऊया.
सोन्याच्या दराने आजही उच्चांकाची पातळी गाठली आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार २२ कॅरेट सोन्यासाठी १ ग्रॅमचा भाव ५,४१५ रुपये तर २४ कॅरेटनुसार प्रतितोळ्यासाठी ५९,०६० रुपये मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या दरात प्रतितोळ्यासाठी ३८०० रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदीचा आजचा भाव किती?
चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. त्यामुळे आज प्रति किलो चांदीसाठी ७२,६०० रुपये मोजावे लागणार आहे. अशातच आज ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीत पुन्हा यात दोन ते तीन हजारांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
शहरातील आजच्या सोन्याच्या किंमती
मुंबई-पुण्यात आज २४ कॅरेटनुसार प्रति तोळ्यासाठी ५८,९१० रुपये मोजावे लागणार आहे. तर नाशिकमध्ये ५८,९४० रुपये प्रति तोळ्यासाठी मोजावे लागतील. नागपूरमध्ये देखील प्रति तोळ्याला ५८,९१० आज मोजावे लागतील.