दिल्ली विमानतळावर 83 लाख रुपये किमतीचं सोनं जप्त, बँकॉकहून इलेक्ट्रिक हिटरमध्ये लपवून आणलं होतं!

सीमाशुल्क विभागाने दिल्ली विमानतळावर 83 लाख रुपयांच्या सोन्यासह एका प्रवाशाला अटक केली आहे. सध्या या प्रवाशाची चौकशी सुरू आहे.

    दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर सीमाशुल्क विभागाने सोने (Gold worth Rs 83 lakh seized at Delhi airport) जप्त केले आहे. कस्टम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी 1500 ग्रॅममध्ये 83 लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. ज्याला एक प्रवासी इलेक्ट्रिक वॉटर हिटरमध्ये लपवून बँकॉकहून दिल्लीला आणत होता. कस्टम अॅक्ट 1962 अंतर्गत या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. सध्या तपास सुरू आहे.