
सणासुदीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी 2022-23 या वर्षासाठी बिगरराजपत्रित गट B आणि गट C कर्मचार्यांसाठी नॉन-प्रॉडक्शन लिंक्ड बोनस जाहीर केला.
सणासुदीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी 2022-23 या वर्षासाठी बिगरराजपत्रित गट B आणि गट C कर्मचार्यांसाठी नॉन-प्रॉडक्शन लिंक्ड बोनस (Diwali Bonus) जाहीर केला. यामध्ये गट क आणि ब गटातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून एक महिन्याच्या पगाराएवढी रक्कम दिली जाते. वित्त मंत्रालयाने मंगळवारी 2022-23 साठी अराजपत्रित केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 7,000 रुपयांचा बोनस जाहीर केला. मंत्रालयाच्या कार्यालयीन निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. या दिवशी होऊ शकतो डीए वाढीचा निर्णय, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात एवढी वाढ होणार आहे.
दिवाळी बोनस जाहीर
निवेदनात असे म्हटले आहे की, हा बोनस अशा कर्मचाऱ्यांना दिला जाईल जे कोणत्याही ‘उत्पादकता लिंक्ड बोनस योजने’चा लाभ घेत नाहीत. वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने मेमोरँडममध्ये म्हटले आहे की ‘नॉन-प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस’ (अॅड-हॉक बोनस) लेखा वर्ष 2022-23 साठी 30 दिवसांच्या मानधनाच्या बरोबरीने सर्व गट ‘क’ आणि केंद्र सरकारच्या गट ‘ब’ अराजपत्रित कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. बोनसचा लाभ केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील पात्र कर्मचाऱ्यांनाही मिळेल. याशिवाय हंगामी कर्मचारीही याच्या कक्षेत येतात.
अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाच्या निवेदनानुसार, हा बोनस त्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिला जाईल जे ३१ मार्च २०२३ पर्यंत सेवेत आहेत आणि २०२२-२३ या वर्षात किमान ६ महिने काम केले आहेत.
डीए वाढीची लवकरच घोषणा होऊ शकते
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी मंत्रिमंडळ दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यातही वाढ करू शकते. सूत्रांनी सांगितले की, महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढून 46 टक्के होण्याची शक्यता आहे. बुधवारी (18 ऑक्टोबर) मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत महागाई भत्त्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.