Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील अनेक भागांत तापमानात वाढ; राजधानी दिल्लीत उष्णतेने 15 वर्षांचा रेकॉर्डच मोडला, पुढील 7 दिवस…

दिल्लीतील रहिवासी सध्या तीव्र उष्णतेचा सामना करत आहेत. पश्चिमेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राजधानी भट्टीसारखी तापली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, गेल्या बुधवारी रात्री १५ वर्षांचा विक्रम मोडला गेला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 22, 2026 | 07:22 AM
राज्यात 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता

राज्यात 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी पाऊस झाल्याचे पाहिला मिळाले तर काही ठिकाणी अद्याप उष्णतेची लाट कायम आहे. असे असताना आता हवामान विभागाने 22 ते 27 मे या कालावधीत दिल्लीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेची शक्यताही यादरम्यान व्यक्त केली आहे.

22 ते 27 मे या काळात, कमाल तापमान ४४ ते ४६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २९ ते ३२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आकाश बहुतांशी निरभ्र राहील, ज्यामुळे सूर्यप्रकाशाची तीव्रता आणखी वाढेल. दिल्लीतील रहिवासी सध्या तीव्र उष्णतेचा सामना करत आहेत. पश्चिमेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राजधानी भट्टीसारखी तापली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, गेल्या बुधवारी रात्री १५ वर्षांचा विक्रम मोडला गेला. किमान तापमान ३१.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा ५.२ अंशांनी जास्त होते.

दुसरीकडे, गुरुवारी दिल्लीतील रहिवाशांना तीव्र उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. दिवसभर उष्णतेची लाट कायम होती, बहुतेक भागांमध्ये दिवसाचे तापमान ४४ किंवा ४५ अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. सलग सहाव्या दिवशी पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर राहिला असून, कमाल तापमान ४१.७ अंश सेल्सिअस होते.

सफदरजंग आणि लोधी रोड या केंद्रांवर सर्वाधिक उष्णतेची नोंद झाली. जेव्हा कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक होते आणि किमान तापमान सामान्यपेक्षा ४.५ ते ६.४ अंश सेल्सिअसने कमी असते, तेव्हा उष्ण रात्रीची घोषणा केली जाते. मात्र, येत्या काही दिवसांत या तीव्र उष्णतेपासून कोणताही दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

वर्ध्यात तापमानाचा पारा पोहोचला 47.1 अंशांवर

विदर्भात सूर्य आग ओकत असून, उष्णतेच्या तीव्र लाटेने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी वर्ध्यात पारा ४७.१ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक अक्षरशः होरपळून निघाले. यावर्षी उन्हाळ्यात तीनदा वर्धा जिल्ह्याचे तापमान ४६.५ अंशावर गेले होते. बुधवारी सर्व विक्रम मोडीत काढत तापमानाने उच्चाक गाठला. तर नागपूर येथे ४६.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.

Maharashtra Mansoon Coming Soon ! २६ मेपर्यंत केरळमध्ये, महाराष्ट्रात कधी? मान्सून हवामान विभागाकडून गुड न्युज

Web Title: Heat breaks 15 year record in the capital delhi the next 7 days also temperature rises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 07:12 AM

Topics:  

  • Climate Change
  • Increase in Temperature
  • Weather Update

संबंधित बातम्या

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
1

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
2

Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…
3

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट
4

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.