Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दुगारवाडी धबधबा, हरिहर गड बंद; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Nashik Rain Update News : अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तश्रृंगी देवस्थान तसेच दुगारवाडी धबधबा, हरिहर गडसह सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिक व भाविकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 06, 2026 | 03:47 PM
पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दुगारवाडी धबधबा, हरिहर गड पुढील आदेशापर्यंत बंद; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दुगारवाडी धबधबा, हरिहर गड पुढील आदेशापर्यंत बंद; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • त्र्यंबकेश्वर देवस्थान मंगळवारी पूर्णपणे बंद राहणार
  • नाशिक जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद राहणार
  • नाशिक, सटाणा, बागलाण, दिंडोरीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता
  • नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषदेतून माहिती
Nashik Rain Update News Marathi : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर नाशिकमधील महत्त्वाची पर्यटन स्थळे बंद करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तश्रृंगी देवस्थान तसेच दुगारवाडी धबधबा, हरिहर गडसह सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवार, 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यासाठी हाय अलर्ट जारी केला असून, नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीसदृश अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व्यापक खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत.

Nashik Rain Devendra Fadnavis : उद्या नाशिकसाठी धोक्याचा दिवस? 300 मिमी पावसाचा अंदाज, प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरदरम्यान काही भागांत सुमारे 300 मिमीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा.

पर्यटनस्थळे आणि देवस्थाने बंद

सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दुगारवाडी धबधबा, हरिहर गड तसेच इतर लोकप्रिय पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. ही बंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहू शकते. तसेच, त्र्यंबकेश्वर मंदिर मंगळवारी भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. भाविकांनी मंदिरात येणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सप्तशृंगी देवस्थान देखील अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे बंद ठेवण्यात येणार असून, यात्रेकरूंनी प्रवास पुढे ढकलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रशासन सज्ज, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

संभाव्य पूरस्थिती, दरडी कोसळण्याचा धोका आणि नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल विभाग, पोलीस, आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील संवेदनशील गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार स्थलांतराची तयारीही करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना नदी, धबधबे, घाटरस्ते आणि डोंगराळ भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • अनावश्यक प्रवास टाळा.
  • पर्यटनस्थळे आणि घाट परिसरात जाणे टाळा.
  • प्रशासन आणि हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करा.
  • अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या.
  • आपत्कालीन परिस्थितीत तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हवामानातील बदलांवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून परिस्थितीनुसार पुढील निर्णय जाहीर केले जातील. नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Karjat News : कर्जतच्या पळसदरीत दरड कोसळली; पाच वाहने मातीखाली, मुख्य रस्ता बंद

Web Title: Nashik tourist places trimbakeshwar saptashrungi temples closed heavy rain alert news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • Weather Update

संबंधित बातम्या

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत
1

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई
2

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
3

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण
4

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.