नवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत जागतिक तापमानात वाढ (Increase in Temperature) होण्याची शक्यता आहे. 2023 ते 2027 या काळात कमाल उष्णता कमी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. या पाच वर्षांत एक असं वर्षही असेल जे 2016 च्या तापमानाचा विक्रम मोडणारे (Sun Stroke) वर्ष ठरेल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
युनायटेड नेशन्सच्या (UN) जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे की, जागतिक तापमान लवकरच पॅरिस हवामान करारामध्ये निश्चित केलेल्या तापमानाची मर्यादा ओलांडण्याची शक्यता आहे. 2016 चे वार्षिक तापमान 1.28 डिग्री सेल्सियस होते, जे प्री इंडस्ट्रियल टाईमहून (1850-1900 या कालावधीतील सरासरी) अधिक होते. 2015 ते 2022 या कालावधीतील आठ सर्वात उष्ण वर्षांची नोंद करण्यात आली आहे. आता हवामान बदलाच्या वेगामुळे तापमानात आणखी वाढ म्हणण्यानुसार, पुढील पाच वर्षांमध्ये विक्रमी उष्णता वाढण्याची 98 टक्के शक्यता आहे.
पुढील 12 महिने धोक्याचे
नासाने जारी केलेल्या नकाशात लाल आणि पांढऱ्या रंगाचे समुद्राचे क्षेत्र दिसत आहे, तिथे गरम होण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएमओच्या पाणी वाहत आहे. या गरम पाण्यामुळे देशाच्या विविध भागात भयंकर उष्मा आणि पावसाळा येणार आहे. यावेळी अल-निनो आणि सुपरचार्ज केलेले समुद्राचे तापमान एकत्र येत आहे. त्यामुळे पुढील 12 महिने अनेक प्रकारचे रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात. यातील बहुतांश तापमान कमाल तापमानाशी संबंधित असेल.
तापमान वाढण्याचे कारण
ग्रीन हाऊस गॅस आणि एल निनोमुळे वाढत्या तापमानाचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. हवामान बदलाच्या वेगामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये जागतिक तापमान 1850-1900 च्या सरासरीपेक्षा 1.15 C वर होते. याशिवाय एप्रिलमधील तीव्र उष्णतेसाठी हवामानातील बदलांना सर्वाधिक जबाबदार धरले जाऊ शकते.