Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरात, ओडिशासह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील तीन दिवसांसाठी…

भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील काही भागांमध्ये, तसेच शेजारील अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 31, 2026 | 07:27 AM
गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात आता हवामान विभागाने १२ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळांचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश व नागालँड या राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे.

या काळात वाऱ्याचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील काही भागांमध्ये, तसेच शेजारील अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिल्लीसह संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे.

Maharashtra Rain Alert : राज्यावर भीषण संकट ! ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस; खडकवासला धरणातून…

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील डोडा आणि किश्तवार जिल्ह्यांच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेजारील किश्तवार जिल्ह्यातही, सततच्या मुसळधार पावसामुळे रस्ते निसरडे होण्याची आणि दगड कोसळण्याची चिंता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

जुलैमध्ये पावसाची विक्रमी नोंद

महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस झाल्याचे पाहिला मिळाले. मुंबईसह इतर अनेक शहरांत पाऊस झाला होता. त्यात पुणे शहराने यंदाच्या जुलैमध्ये विक्रमी पावसाची नोंद करत ११९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) शिवाजीनगर वेधशाळेच्या नोंदीनुसार, बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंत जुलै महिन्यात ५०८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९०७ मध्ये ५०८.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे तब्बल ११९ वर्षांनंतर पुण्यात जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम

दुसरीकडे, राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाडा जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देण्यात आले आहे.

Web Title: Heavy rain warning for 12 states in the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 07:14 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Monsoon News
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात 22 सप्‍टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
1

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात 22 सप्‍टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

Weather Update : राज्यभरात पावसाचा मोठा खंड; पाणीटंचाईची निर्माण झाली धास्ती, प्रशासन सतर्क
2

Weather Update : राज्यभरात पावसाचा मोठा खंड; पाणीटंचाईची निर्माण झाली धास्ती, प्रशासन सतर्क

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना निर्माण झाला धोका
3

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना निर्माण झाला धोका

पाऊस गायब, कडक ऊन अन् सुकलेली पिके; धाराशिवमध्ये सप्टेंबर महिन्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती
4

पाऊस गायब, कडक ऊन अन् सुकलेली पिके; धाराशिवमध्ये सप्टेंबर महिन्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.