Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील अनेक ठिकाणी पुन्हा मुसळधार पाऊस होणार; आसाम, मेघालयसह ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा

दिल्लीत ताशी ४० ते ५० किमी वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून, कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 28, 2026 | 08:04 AM
ईशान्य ते मध्य भारतातील अनेक राज्यांत पाऊस

ईशान्य ते मध्य भारतातील अनेक राज्यांत पाऊस

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. पावसाने उघडीप दिल्याचे दिसत असताना आता देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशासह 22 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी पावसाचा इशारा दिला आहे.

हवामानशास्त्रज्ञांच्या मते, या काळात ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाचे वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, त्यामुळे उभ्या पिकांचे आणि सखल भागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सर्वात गंभीर परिस्थिती ओडिशामध्ये अपेक्षित आहे, जिथे २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, बिहारमध्ये मुसळधार पावसासह मध्यम ते तीव्र स्वरूपाचा विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दिल्लीत ताशी ४० ते ५० किमी वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून, कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बांदा येथील सखल भागात पाणी साचले असून, झाशी आणि लखनौमधील प्रशासनाने जोरदार वीजप्रपातामुळे सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तराखंड आणि झारखंडमध्येही मेघगर्जनेसह पाऊस राहील असा अंदाज आहे. दक्षिण आणि पश्चिम भारतातील केरळ, किनारपट्टीवरील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका आणि मैदानी भागात पाणी साचण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्रात हलका पाऊस

शुक्रवारी, महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा सरींची शक्यता आहे. मुंबई आणि आसपासच्या किनारपट्टीच्या भागात ढगाळ आकाशासह हलका ते मध्यम पाऊस पडेल.

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

Web Title: Heavy rainfall is expected again in many parts of the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
1

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
2

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
3

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
4

Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.