File Photo l Crime
रस्त्यावर वाहनाचा अपघात झाल्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करायचं सोडून पळ काढणारे अनेक जण असतात. तर काही लोकं दिसताक्षणी मदतीला धावून येणारेही असतात. पण गुजरातमधून काहीचं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तिच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याने स्वत: विरोधातच गुन्हा दाखल केला आहे. पत्नीच्या निधनानंतर दु:खी झालेल्या नवऱ्यानं पोलिस स्टेशनमध्ये स्वत:विरोधातच गुन्हा (FIR) दाखल केलाय. परेश दोशी असं या व्यक्तीचं नाव आहे.
[read_also content=”36 भाषांमध्ये आवाज देऊन लता मंगेशकर बनल्या गानसम्राज्ञी, वयाच्या 11 व्या वर्षी गायनाला सुरुवात! https://www.navarashtra.com/movies/lata-mangeshkar-death-anniversary-she-gave-voice-to-songs-in-36-languages-know-about-her-music-career-nrps-505009.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील (Gujarat) नर्मदा जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. ज्याची संपूर्ण राज्यात चर्चा सुरु आहे. परेश दोशी पत्नीसोबत कारनं येत असताना महामार्गावर त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीला गमावल्याच्या दु:खामुळे व्यथित होऊन त्यांनी स्वत:विरोधातच गुन्हा (FIR) दाखल केलाय.
परेश दोशी म्हणाले की, गाडी चालवताना माझ्याकडून चूक झाली. त्यामुळे श्वानाला धडकणारी कार अचानक वळवली, त्यामुळे डिव्हायडरला धडकली. त्यामुळे पत्नीचं निधन झालं. माझ्या चुकीमुळे पत्नीचं निधन झालं. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करतोय, असं त्यांनी म्हण्टलंय. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास सुरु झालाय.
गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे डिव्हायरला धडकली. त्यानंतर कारचा दरवाजा ऑटो लॉक झाला. त्यामुळे दोघेही गाडीतच अडकले, असे दोशी यांनी पोलिसांना सांगितलं. अपघात झाल्यानंतर उपस्थित असणाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. लोकांनी दोशी दाम्पत्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा उघडला नाही. त्यानंतर काही जणांनी गाडीच्या दरवाजाची काच फोडून दोघांनाही बाहेर काढले, असे दोशी यांनी सांगितलं. लोकांनी गाडीची काच फोडून दोघांनाही बाहेर काढण्यात आलं. पण रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले. पण पत्नीचं निधन झालं होतं.






