Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Agniveers New Rules: अग्निवीरांसाठी लष्कराचे कडक नियम! सेवेदरम्यान लग्न केल्यास…; वाचा नवीन गाईडलाईन

भारतीय लष्कराने अग्निवीरांसाठी लग्नाबाबत कडक नियम जाहीर केले आहेत. सेवेदरम्यान किंवा कायमस्वरूपी नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी लग्न करणाऱ्या अग्निवीरांना परमानंट नोकरी मिळणार नाही.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 06, 2026 | 08:36 PM
अग्निवीरांसाठी लष्कराचे कडक नियम! सेवेदरम्यान लग्न केल्यास...; वाचा नवीन गाईडलाईन (Photo Credit- X)

अग्निवीरांसाठी लष्कराचे कडक नियम! सेवेदरम्यान लग्न केल्यास...; वाचा नवीन गाईडलाईन (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • लग्नाचा विचार करताय?
  • अग्निवीरांसाठी लष्कराचा नवा फतवा
  • नियम मोडल्यास कायमस्वरूपी नोकरीचे स्वप्न भंगणार
Agniveers Guidelines: भारतीय लष्करात अग्निवीर (Agniveer) म्हणून सेवा बजावणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर भारतीय सैन्यात कायमस्वरूपी (Permanent) सैनिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अग्निवीरांसाठी लष्कराने विवाहाबाबत एक नवा आणि कडक नियम लागू केला आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित अग्निवीराला कायमस्वरूपी नियुक्ती प्रक्रियेतून थेट बाहेर काढले जाणार आहे.

काय आहे लष्कराचा नवीन नियम?

सेवेदरम्यान लग्नावर बंदी: जोपर्यंत एखादा अग्निवीर भारतीय लष्करात कायमस्वरूपी सैनिक म्हणून नियुक्त होत नाही, तोपर्यंत त्याला लग्न करता येणार नाही. चार वर्षांच्या सेवेच्या काळात लग्न करणे हे थेट अपात्रतेचे कारण ठरेल.

चयन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा

चार वर्षांची सेवा संपल्यानंतरही कायमस्वरूपी निवडीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण ४ ते ६ महिने लागतात. जोपर्यंत अंतिम निवड यादीत नाव येत नाही आणि परमानंट अपॉइंटमेंट मिळत नाही, तोपर्यंत अग्निवीरांना अविवाहित राहणे अनिवार्य आहे. जर एखाद्या अग्निवीराने चार वर्षांच्या सेवेदरम्यान किंवा निवड प्रक्रिया सुरू असताना लग्न केले, तर तो कायमस्वरूपी सेवेसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अशा उमेदवारांना निवड प्रक्रियेतून पूर्णपणे बाद केले जाईल.

DRDO to Test ‘Dhvani’ : डीआरडीओच्या ‘ध्वनी’ हायपरसोनिक क्षेपणास्त्राची ७,४०० किमी/ताशी चाचणी; भारताची संरक्षणशक्ती नवी उंची गाठणार

अग्निवीर योजनेची सद्यस्थिती

ही योजना २०२२ मध्ये सुरू करण्यात आली होती. आता पहिली बॅच त्यांची चार वर्षांची सेवा पूर्ण करण्याच्या जवळ आहे, त्यामुळे हे नियम अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत. किती जण होणार परमानंट? लष्कराच्या नियमांनुसार, प्रत्येक बॅचमधील केवळ २५ टक्के अग्निवीरांनाच त्यांच्या गुणवत्ता (Merit), शारीरिक क्षमता आणि कामगिरीच्या आधारावर कायमस्वरूपी सैनिक बनण्याची संधी मिळेल.

कायमस्वरूपी नियुक्तीनंतर सूट

लष्कराने स्पष्ट केले आहे की, एकदा का अग्निवीराची निवड कायमस्वरूपी सैनिक म्हणून झाली की, त्याला लग्नाचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. नियुक्तीनंतर विवाह करण्यावर कोणतेही निर्बंध नसतील आणि ते आपल्या वैयक्तिक जीवनाचे निर्णय घेऊ शकतील.

Web Title: If an agniveer soldier gets married during their service their permanent job prospects will be jeopardized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 08:36 PM

Topics:  

  • Agniveer Scheme
  • central goverment
  • marriage

संबंधित बातम्या

Ration Card E-KYC: रेशन कार्ड ई-केवायसी आता घरबसल्या मोबाईलवर; ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करा आणि रेशन बंद होण्यापासून वाचवा
1

Ration Card E-KYC: रेशन कार्ड ई-केवायसी आता घरबसल्या मोबाईलवर; ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करा आणि रेशन बंद होण्यापासून वाचवा

व्यसनींना दणका, कंपन्यांना झटका! सिगरेट, विडी अन् पान मसाला महागले! ‘या’ तारखेपासून होणार दरवाढ
2

व्यसनींना दणका, कंपन्यांना झटका! सिगरेट, विडी अन् पान मसाला महागले! ‘या’ तारखेपासून होणार दरवाढ

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद
3

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.