Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येणार? विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अण्णा हजारेंची एन्ट्री; पाठिंबा जाहीर करत केली मोठी घोषणा

Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या या लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून ते स्वतः मैदानात उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अण्णा हजारे गुरुवारी 'मौन आंदोलन' करणार असून त्यांनी केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांशी तात्काळ संवाद साधण्याची मागणी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 22, 2026 | 06:38 PM
विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अण्णा हजारेंची एन्ट्री (Photo Credit- X)

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अण्णा हजारेंची एन्ट्री (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • आत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येणार?
  • विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अण्णा हजारेंची एन्ट्री
  • पाठिंबा जाहीर करत केली मोठी घोषणा
Anna Hazare News Marathi: देशातील नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. अशातच एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी विद्यार्थ्यांच्या या लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून ते स्वतः मैदानात उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अण्णा हजारे गुरुवारी ‘मौन आंदोलन’ करणार असून त्यांनी केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांशी तात्काळ संवाद साधण्याची मागणी केली आहे.

अहिल्यानगरच्या वाडिया पार्कमध्ये उभारणार ‘नगरचे जंतर-मंतर’

अण्णा हजारे यांनी जाहीर केलेल्या आंदोलनानुसार, गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अहिल्यानगर येथील वाडिया पार्क परिसरातील महात्मा गांधी स्मारकासमोर ते मौन आंदोलनाला बसणार आहेत. विशेष म्हणजे, दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर आंदोलनाची आठवण म्हणून अण्णा हजारे जिथे आंदोलन करणार आहेत, त्या जागेला प्रतिकात्मक “नगरचे जंतर-मंतर” असे नाव देण्यात येणार आहे. अण्णांच्या या अचानक झालेल्या एंट्रीमुळे केंद्र सरकारवरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; देशभरातून पाठिंबा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि लाखो विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर सोमवारी झालेल्या लाठीमारानंतर या आंदोलनाचा भडका उडाला असून संपूर्ण देशभरातून तरुणांना पाठिंबा मिळत आहे. विरोधी पक्षांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे, तसेच उद्धव ठाकरे यांनी जंतर-मंतरवर प्रत्यक्ष जाऊन आंदोलक नेते अभिजीत दिपके यांची भेट घेतली. शरद पवार यांनीही जंतर-मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. राहुल गांधी यांनी आंदोलन करत सरकारचा तीव्र निषेध नोंदवला.

Rahul Narwekar: ‘उद्धव ठाकरे नेहमी चुकीचेच व्यासपीठ निवडतात’; राहुल नार्वेकर यांचा थेट टोला, तर काँग्रेसवरही जोरदार निशाणा

अनेक वर्षांनंतर अण्णा हजारे पुन्हा आंदोलनाच्या मैदानात!

काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचारविरोधी लोकपाल विधेयकासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर ऐतिहासिक आंदोलन करून अण्णा हजारे यांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून अण्णा हजारे कोणत्याही मोठ्या राजकीय किंवा सामाजिक आंदोलनाच्या व्यासपीठावर दिसले नव्हते. आता थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसणार असल्याने या ‘मौन आंदोलनाकडे’ संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंद’ची हाक

दिल्लीतील घटनेचा तीव्र निषेध करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “संसद परिसरात शांततापूर्ण मार्गाने आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या निष्पाप तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. सरकारची ही दडपशाही अत्यंत संतापजनक आहे. या अन्यायाविरुद्ध आणि पीडित विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी राज्यव्यापी बंदचे आयोजन केले आहे.” ते पुढे म्हणाले, “मी राज्यातील सर्व समविचारी राजकीय पक्ष, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आग्रहाची विनंती करतो की, त्यांनी या अत्याचाराविरोधात एकत्र यावे आणि २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’ला पूर्ण ताकदीने पाठिंबा द्यावा.”

‘विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज अमान्य, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या’; ठाकरे-केजरीवाल यांचा जंतर-मंतरवरील आंदोलनाला पूर्ण पाठिंबा

Web Title: Anna hazare to hold silent protest in support of students in ahilyanagar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Anna Hazare
  • central goverment
  • CJP Protest
  • Dharmendra Pradhan
  • Maharashtra Politics
  • New Delhi

संबंधित बातम्या

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त
1

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?
3

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
4

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.