Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Rain News: घराच्या बाहेर जाताय? मग ही बातमी वाचाच; IMD ने दिला ‘या’ राज्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा

उत्तर भारतासोबतच दक्षिण भारतात देखील पाऊस मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तामिळनाडूमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ राज्यांमध्ये देखील पावसाचे जोरदार हजेरी लावली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 07, 2025 | 03:31 PM
India Rain News: घराच्या बाहेर जाताय? मग ही बातमी वाचाच; IMD ने दिला ‘या’ राज्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा
Follow Us
Follow Us:

Heavy Rain In India: गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. पर्वतीय राज्यांमध्ये आणि दक्षिण भारतात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड भागात जोरदार पाऊस सुरु आहे. या राज्यांमध्ये भुसखलन आणि पूरस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. उत्तरकाशीत ढगफुटी झाल्याने स्थिती गंभीर झाली आहे. दरम्यान आज भारतीय हवामान विभागाने कोणकोणत्या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै महिन्यात झालेल्या पावसाने १,६२६ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. आज राजधानी दिल्ली आणि एनसीआर भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील ४८ तास मुसळधार पाऊस दिल्ली आणि एनसीआर परिसरात होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आज मध्यप्रदेश या राज्यात देखील मुसळधार पाऊस होऊ शकतो. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडू राज्यात देखील जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. दरडी कोसळल्या आहेत. पूरस्थिती देखील काही ठिकाणी निर्माण झाली आहे.

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस होणार

उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग, बागेश्वर, डेहराडून या ठिकाणी अति ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्तराखंडमध्ये अधिक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तरकाशी येथील दुर्घटनेमुळे अनेक पर्यटक तिथे अडकून पडले आहेत. काही भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग बंद झाले आहेत.

दक्षिण भारतात पुराचे संकट

उत्तर भारतासोबतच दक्षिण भारतात देखील पाऊस मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तामिळनाडूमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ राज्यांमध्ये देखील पावसाचे जोरदार हजेरी लावली आहे.

बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांमध्ये हवामान विभागाने पुराचा धोका निर्माण झाला आहे. हिमाचल प्रदेशच्या काही जिल्ह्यांत रेड अलर्ट देण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये देखील रेड अलर्ट जारी केला गेला आहे. तामिळनाडू राज्यात भवानी नदी धोका पातळीवरून वाहत आहे. उत्तर प्रदेशमध्ये गंगा आणि यमुना नदीने प्रचंड स्वरूप धारण केल्याने २१ जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Imd heavy rain alert to uttarakhand maharashtra south india delhi india monsson alert weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 03:31 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Rain News
  • weather department

संबंधित बातम्या

बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा; DCM सुनेत्रा पवारांचे निर्देश
1

बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा; DCM सुनेत्रा पवारांचे निर्देश

उपमुख्यमंत्र्यांनी केली बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद
2

उपमुख्यमंत्र्यांनी केली बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची हजेरी; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
3

Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची हजेरी; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

‘नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांनी खचू नये, शासन आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे,’ कृषिमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद
4

‘नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांनी खचू नये, शासन आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे,’ कृषिमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.