Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट! ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस; खडकवासला धरणातून…

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा गुरुवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजेपर्यंत ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 23, 2026 | 09:35 PM
दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले...

दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले...

Follow Us
Follow Us:
  • पुणे शहरात पावसाचा जोर वाढला 
  • खडकवासला धरण ९५ टक्के भरले
  • राज्यात मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज 
Pune Rain Alert/Weather Updates: पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असून गुरुवारी (दि. २३) सकाळी ६ वाजेपर्यंत खडकवासला धरण प्रणालीतील चारही धरणांमध्ये एकूण २१.०३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, पवना धरणात ९२.०१ टक्के, तर मुळशी धरणात ८३.८१ टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान राज्यात देखील पवसच जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे .
#SatarkAlert #HeavyRain
२३ जुलै; १८:३५ (पुढील ६ तास)
• संततधार पावसासह मुसळधार सरी. जिल्हे: पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा राज्य | घाट आणि लगतचा पूर्व भाग- नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.
• घाट रस्त्यांनी प्रवास करताना काळजी घ्यावी. pic.twitter.com/AqzTna8bME
— satark (@satarkindia) July 23, 2026

खडकवासला धरणात १.७५ टीएमसी (८८.५२ टक्के), वरसगाव धरणात ९.११ टीएमसी (७१.०५ टक्के), पानशेत धरणात ८.१४ टीएमसी (७६.४४ टक्के) आणि टेमघर धरणात २.०३ टीएमसी (५४.६८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच, पवना धरणात ७.८३ टीएमसी (९२.०१ टक्के) आणि मुळशी धरणात १६.८९ टीएमसी (८३.८१ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, सकाळी ६ वाजेपर्यंत कोणत्याही धरणातून सांडवा अथवा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू नव्हता.

Wardha : पावसाची सर्वदूर संततधार ! आणखी २ दिवस बरसणार; शुक्रवारीही ‘यलो अलर्ट’चा इशारा

खडकवासला धरण ९५ टक्के भरले

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा गुरुवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजेपर्यंत ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता असल्याने पाटबंधारे विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. हवामान आणि पर्जन्यमानाचा अंदाज लक्षात घेता धरण अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता असल्याने आवश्यकतेनुसार सांडव्यावरून पाणी सोडण्यात येणार आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुहडील कह इवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 25 ते 26 जुलै महिन्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पुणे, सातारा, पालघर आणि घाटमाथ्यावर पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तानसा,विहार, तुळशी तलाव तुडुंब भरले. तलावांत एकूण ६१.९० टक्के जलसाठा

#खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून आज रात्री ९.३० वाजता #मुठानदी पात्रामध्ये सुरु असलेल्या ३ हजार ८२५ क्युसेकमध्ये वाढ करुन ९ हजार ४०५ क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरु नये, खबरदारी घ्यावी-जिल्हा प्रशासन — DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 23, 2026

पुढील 6 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये संततधार पुस आणि मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घाट आणि आणि लगतचा पूर्व भाग- नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये पण पावसाचा अंदाज आहे. घाट रस्त्यांनी प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Khadakwasla dam water discharge and imd heavy rain alert konkan and maharashtra latest weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Khadakwasla Dam
  • Pune Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…
1

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
2

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
3

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Breaking News Today 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार
4

Maharashtra Breaking News Today 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.