Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi on BJP: काँग्रेसचा ‘वोट चोरी’वर एल्गार! राहुल गांधींचा मोदी-शहांवर हल्ला, म्हणाले- ‘सत्याच्या बळावर त्यांना…’

Rahul Gandhi Speech: राहुल गांधी यांनी या वेळी अंदमान निकोबारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख केला. मोहन भागवत म्हणाले होते की....

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 14, 2025 | 05:45 PM
काँग्रेसचा 'वोट चोरी'वर एल्गार! राहुल गांधींचा मोदी-शहांवर हल्ला (Photo Credit - X)

काँग्रेसचा 'वोट चोरी'वर एल्गार! राहुल गांधींचा मोदी-शहांवर हल्ला (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • ‘सत्य विरुद्ध सत्ता’ संघर्ष!
  • राहुल गांधींचा RSS-मोदी सरकारवर थेट हल्ला
  • दिल्लीतील ‘वोट चोरी’ रॅली 
Rahul Gandhi on BJP Marathi News: दिल्लीच्या रामलीला मैदानात आयोजित केलेल्या ‘वोट चोरी’ रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) आरएसएस (RSS) आणि मोदी सरकारवर (Modi Goverment) जोरदार टीकास्त्र सोडले. सध्या ‘सत्य आणि सत्ता’ यांच्यात लढाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

“संघ म्हणतो सत्य नाही, सत्ता महत्त्वाची”

राहुल गांधी यांनी या वेळी अंदमान निकोबारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख केला. मोहन भागवत म्हणाले होते की, “जग सत्याला नाही तर शक्तीला मानते, ज्याच्या हातात शक्ती आहे त्यालाच मानले जाते.” राहुल गांधी म्हणाले की, “ही मोहन भागवत यांची आणि आरएसएसची विचारधारा आहे. जगातील प्रत्येक धर्माची विचारधारा सांगते की सत्य सर्वात महत्त्वाचे आहे. पण भागवत म्हणतात की सत्याची गरज नाही, सत्ता सर्वात महत्त्वाची आहे.”

LIVE: Shri Rahil Gandhi ji at Vote Chor, Gaddi Chhod Maha Rally | Ramlila Maidan, Delhihttps://t.co/cX7taLrx36 — Srinivas BV (@srinivasiyc) December 14, 2025

सत्याच्या बळावर मोदी-शहांना हटवणार

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, आपल्या धर्मात ‘सत्यम शिवम सुंदरम्’ म्हटले जाते, म्हणजे सत्य सर्वात महत्त्वाचे मानले जाते. हा देश सत्यावर चालतो. देशातील जनता सत्याला समजते आणि सत्यासाठी लढते. “पण संघासाठी सत्य नाही, सत्ता महत्त्वाची आहे. मात्र, मी तुम्हाला खात्री देतो की, आम्ही सत्याच्या बळावर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आरएसएसचे हे सरकार सत्तेतून हटवू.”

हे देखील वाचा: Mohan Bhagwat : “देशाच्या पुढील पंतप्रधानांबाबत चर्चा आणि निर्णय…”, आरएसएस प्रमुख मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

निवडणूक आयोग भाजपसाठी काम करतोय

राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, “निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे. आयोगाने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. ते असत्याच्या बाजूने आहेत.” त्यांनी आरोप केला की, पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयुक्तांसाठी कायदा बदलला. ज्ञानेश कुमार, डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासाठी पंतप्रधानांनी कायदा बदलला.

कारवाईचा इशारा…

“ते नवा कायदा घेऊन आले आणि म्हणाले की, निवडणूक आयुक्तांनी काहीही केले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. आम्ही हा कायदा बदलू आणि तुमच्यावर कारवाई करू, कारण आम्ही सत्याची लढाई लढत आहोत आणि तुम्ही असत्याच्या बाजूने उभे आहात.”

“अमित शहांचे हात कापत होते”

राहुल गांधी म्हणाले, “सभागृहात अमित शहांचे हात कापत होते. त्यांच्या हातात सत्ता आहे तोपर्यंतच ते बहादुर आहेत. ज्या दिवशी सत्ता जाईल, त्याच दिवशी त्यांची बहादुरीही निघून जाईल.”

प्रियंका गांधींचे भाजपला आव्हान

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी भाजपला आव्हान दिले. त्या म्हणाल्या की, संसदेत राष्ट्रगीतावर चर्चा होते, पण लोक ज्या समस्यांशी झगडत आहेत – बेरोजगारी, महागाई, पेपर लीक यावर चर्चा करण्याची हिंमत भाजपमध्ये नाही. “मी भाजपला आव्हान देते की त्यांनी एकदा बॅलेट पेपरवर निष्पक्ष निवडणूक लढवून दाखवावी. ते कधीही जिंकू शकणार नाहीत आणि ही गोष्ट भाजपलाही माहीत आहे.” प्रियंका गांधी म्हणाल्या की, इतिहासात प्रथमच संपूर्ण विरोधी पक्ष म्हणत आहे की, आम्हाला निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही. आज देशातील प्रत्येक संस्था मोदी सरकारने आपल्यापुढे झुकवली आहे.

हे देखील वाचा: २०२९ ची निवडणूक ‘मोदी विरुद्ध प्रियंका’? राहुल गांधी कमकुवत; भाजपने संसदेत खेळला मोठा राजकीय डाव!

Web Title: In delhi congress launches a protest against vote theft rahul gandhi attacks modi and shah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 05:45 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Modi government
  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi
  • RSS

संबंधित बातम्या

Pax Silica : ट्रम्पने मित्र म्हणून खुपसला मोदींच्या पाठीत खंजीर, Quadमध्ये फूट; ‘या’ महत्वपूर्ण उपक्रमातून भारताला वगळले
1

Pax Silica : ट्रम्पने मित्र म्हणून खुपसला मोदींच्या पाठीत खंजीर, Quadमध्ये फूट; ‘या’ महत्वपूर्ण उपक्रमातून भारताला वगळले

Nepal Politics : भारताने फिरवली नेपाळची सत्तासूत्रे, Gen-Z एक धूर्त षडयंत्र; माजी पंतप्रधान ‘KP Oli’ भव्य रॅलीत ‘असे’ का बरळले?
2

Nepal Politics : भारताने फिरवली नेपाळची सत्तासूत्रे, Gen-Z एक धूर्त षडयंत्र; माजी पंतप्रधान ‘KP Oli’ भव्य रॅलीत ‘असे’ का बरळले?

Pune Election : उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या नेत्यांची होणार दमछाक; 165 जागांसाठी 2500 जणांच्या मुलाखती
3

Pune Election : उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या नेत्यांची होणार दमछाक; 165 जागांसाठी 2500 जणांच्या मुलाखती

Lionel Messi India Tour : Lionel Messi ने हैदराबादमध्ये खेळला फुटबॉल, Rahul Gandhi सोबतही केली खास भेट
4

Lionel Messi India Tour : Lionel Messi ने हैदराबादमध्ये खेळला फुटबॉल, Rahul Gandhi सोबतही केली खास भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.