नवी दिल्ली : ऐन सणासुदीच्या काळात देशातील कोरोना रुग्णांच्या ( Corona Cases In Counrty) ) संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात देशात 1,046 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,46,54,638 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय प्रकरणांची संख्या 17,618 वर आली आहे.
[read_also content=”इलॉन मस्कचे ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश, धोरणांमध्येही बदल होणार https://www.navarashtra.com/world/elon-musks-order-to-lay-off-twitter-employees-will-also-change-policies-nrps-340168.html”]
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार. देशात गेल्या 24 तासात 53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण मृतांची मृतांची संख्या 5,29,077 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये गोव्यातील 46 आणि केरळमधील तीन मृत्यूंचा समावेश आहे.
देशातील एकूण कोरोना रुग्णापैकी ०.०४ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोविड-19 प्रकरणांमध्ये 294 प्रकरणांची घट नोंदवली गेली आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,41,07,943 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी COVID-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 219.64 कोटी डोस देण्यात आले आहेत.
[read_also content=”रस्त्यावर दिसला वाघ, चंद्रपूर येथील अभयअरण्यातील रस्त्यावरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल https://www.https://www.navarashtra.com/world/a-tiger-spotted-on-the-road-a-video-of-the-road-from-the-sanctuary-in-chandrapur-has-gone-viral-on-social-media-nrrd-340852/navarashtra.com/world/elon-musks-order-to-lay-off-twitter-employees-will-also-change-policies-nrps-340168.html”]