Middle East War : ‘आम्ही दलाल नाही...’, पश्चिम आशियातील तणावावर भारताची स्पष्ट भूमिका; पाकिस्तानच्या हस्तक्षेपावर टीका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
War Alert : इराणनंतर आता ‘या’ देशावर युद्धाचे सावट; ट्रम्प यांच्या धमकीनंतर लष्कर हाय-अलर्टवर
पश्चिम आशिायातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी(२५ मार्च २०२६) एक महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, जी सुमारे दीड तास चालली. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्माला सीतारमन आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासह वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान अमेरिका इराणमधील तणाव थांबवण्यासाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी जयशंकर यांनी कठोर भूमिका घेत, भारत दलाल देश नाही अशा शब्दात भूमिका स्पष्ट करत पाकिस्तानच्या हस्तक्षेपाला केराची टोपली दाखवली. त्यांनी म्हटले की, पाकिस्तान १९८१ पासून अशा प्रकारची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत आहे, यामध्ये काहीही नवीन नाही.
याशिवाय बैठकीत इंधनाचा तुटवडा आणि तेलाच्या वाढत्या किमतींबाबत विरोधकांनी चिंता व्यक्त केली होती. यावर केंद्र सरकारने आश्वासन दिले की, भारताची उर्जा सुरक्षा पूर्णपणे सुरक्षित आहे. देशात तेल आणि वायूचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. यासाठी बुकिंह करण्यात आले आहे. तसेच सरकारचे स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील पुरवठासाखळीवर बारकाईने लक्ष आहे. येत्या काही दिवसांत चार जहाजे भारतीय बंदरावर पोहोचतील असे सरकारने स्पष्ट केले.
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेचा तपशील देताना जयशंकर यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना युद्ध थांबलेच आशा स्पष्ट शब्दांत ठणकावले आहे. यामुळे संपूर्ण जगाचे नुकसान होत असून भारत शांततेच्या बाजून असल्याचे त्यांनी ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले आहे.याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, सरकारसाठी आपल्या नागरिकांचे हित आणि सुरक्षा प्रथम आहे.
Ans: बुधवारी (२५ मार्च २०२६) केंद्र सरकराने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मध्यपूर्वेतील संकट, अमेरिका-इराण संघर्ष, देशातील इंधन आणि उर्जा सुरक्षा या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत भारताने मध्यपूर्वेतील संकटावर आपली भूमिकाही स्पष्ट केले.
Ans: जयशंकर यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान अशा प्रकारे मध्यस्थीचा प्रयत्न १९८१ पासून करत आला आहे यामध्ये काहीही नवीन नाही. तसेच भारत दलाल नाही हेही त्यांनी स्पष्ट केले.
Ans: सरकारने भारताची उर्जा सुरक्षा सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींनी तेल आणि गॅसची आधीच पुरेशी व्यवस्था केली असून आयातीत कोणताही अडथळा नसल्याचे सरकारने सांगितले.






