INDIAN ARMY (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)
पहलगाम दहशतवादी हल्ला २२ एप्रिलला झाला. या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने काल रात्री नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेसह अनेक ठिकाणी स्वार्म ड्रोन म्हणजे झुंडीने ड्रोन्स पाठवले. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठानकोटमध्ये भारतीय सैन्याच्या एअर डिफेंस यूनिट्सने काऊंटर-ड्रोन ऑपरेशनमध्ये 50 पेक्षा अधिक ड्रोन्स पाडले.
India vs Pakistan War: पाकिस्तान कुठे कुठे तोंडावर आपटला?
भारत आणि पाकिस्तानने तणाव टिपेला पोहोचला आहे. भारताच्या जोरदार प्रहाराने पाकिस्तानची सगळी हेकडी उतरवली आहे. भारताने पाकिस्तानचे दोन JF- 17 आणि एक F-16 फायटर विमान पाडलं आहे. पाकिस्तानी मिसाईल्स आणि रॉकेट्स हवेतच नष्ट करण्यात आली आहेत. पाकिस्तानचा हवाई हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळून लावला आहे. काल रात्री भारताने तिन्ही दलांची ताकद दाखवून दिलेली आहे. चला जाणून घेऊयात तिन्ही दलांचे तीन हिरोंबद्दल.
L – 70
काल रात्री पाकिस्तानने नियंत्रण रेषेसह आंतरराष्ट्रीय बॉर्डर व अनेक ठिकाणी स्वार्म ड्रोन्सने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठानकोट क्षेत्रात भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्स सिस्टिमने काऊंटर ड्रोन ऑपरेशन करुन पाकिस्तानचे 50 पेक्षा जास्त ड्रोन्स पाडले. भारताने एस-400, एल-70 अँटी-एअरक्राफ्ट गन आणि सोवियत वंशाची ZSU-23-4 शिल्का यूनिट्ससह ड्रोन विरोधी आणि कमी उंचीवरुन उडणाऱ्या टार्गेटसना लक्ष्य करणारी एअर डिफेंस सिस्टमची पुरी सीरीज तैनात आहे. त्याशिवाय अन्य एडवान्स काऊटर-यूएएस इक्विपमेंटचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला. हवाई हल्ले कसे परतवून लावायचे ते सैन्याच्या मजबूत क्षमतेच प्रदर्शन झालं.
S-400
पाकिस्तानने गुरुवारी जम्मू स्थित एअरस्ट्रिपवर रॉकेट डागले. भारतीय सैन्याची सतर्कता आणि मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमने हे हल्ले परतवून लावले. भारतीय सैन्याच्या अत्याधुनिक S-400 एअर डिफेन्स सिस्टिमने तात्काळ कारवाई केली. पाकिस्तानने डागलेलली 8 मिसाईल्स हवेतच नष्ट केली. या मिसाईल्सच टार्गेट जम्मू एअरस्ट्रिप होती. पण त्यांचा इरादा यशस्वी होऊ शकला नाही.भारत-पाकिस्तान सीमेवर तैनता असलेल्या S-400 सिस्टिमने पाकिस्तानच्या सर्व अपेक्षा धुळीस मिळवल्या.
INS विक्रांत
भारताची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतने समुद्रात आपली ताकद दाखवली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबत तणाव वाढला. त्यावेळी भारतीय नौदलाने आधीच INS विक्रांतला समुद्रात तैनात केलं होतं. स्ट्राइक ग्रुपच्या या विमानवाहू युद्धनौकेसोबत फ्रिगेट, पाणबुडी विरोधी युद्धनौका आणि सहाय्यक जहाजं आहेत.
भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी मिळून पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त केली. त्यानंतर पाकिस्तानने मोठे हल्ले केले. भारताने प्रत्येक हल्ला यशस्वीरित्य परतवून लावला.
भारत-पाक तणावाचा विमानसेवेला फटका; तब्बल 430 विमानांची उड्डाणं रद्द तर 27 विमानतळ करण्यात आली बंद