WAR (फोटो सौजन्य SOCIAL MEDIA )
जम्मू काश्मीरमधील एलओसीवर पुन्हा एकदा युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने रात्रभर जोरदार गोळीबार केल्यानंतर भारतानेही तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर दिलं. पूंछ, राजौरी आणि सांबा सेक्टरमध्ये सुरू झालेल्या पाकिस्तानच्या भडकवणाऱ्या कृतीला भारतीय सैन्याने निर्णायक उत्तर दिलं असून, पाकिस्तानच्या चौक्या अक्षरशः राख झाल्या आहेत.
पाकिस्तानकडून हल्ले अन् भारताकडून चोख प्रत्युत्तर; आत्तापर्यंत ‘या’ महत्त्वपूर्ण घडल्या घडामोडी…
कराची बंदरावर भारतीय नौदलाचा धडाकेबाज हल्ला
भारताच्या नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर 14 पेक्षा जास्त मोठे स्फोट घडवत हल्ला चढवला. या हल्ल्यांमुळे संपूर्ण बंदरक्षेत्र हादरून गेलं असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली की पाकिस्तानला बंदर परिसरात ब्लॅकआऊट जाहीर करावा लागला. 1971 नंतर प्रथमच कराची बंदरावर अशा स्वरूपात भारतीय कारवाई झाली आहे. भारताच्या या प्रतिहल्ल्यामुळे पाकिस्तानातील 16 पेक्षा अधिक शहरांमध्ये हाहाकार माजला आहे. इस्लामाबाद, लाहोर, पेशावरसारख्या प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कोलमडली आहे. इस्लामाबादमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ हल्ला झाला, ज्यामुळे त्यांना तत्काळ बंकरमध्ये हलवण्यात आलं.
पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि लढाऊ विमानांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र सर्व हल्ले निष्फळ ठरले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं पाडली. चीननं दिलेले पाकिस्तानचेदोन जेएफ-17 (JF-17) आणि एक एफ-16 (F-16). विशेष म्हणजे एफ-16 हे अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळालेलं अत्याधुनिक विमान होतं. पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनीही ही धक्कादायक कबुली दिली आहे.
भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानमध्ये मोठा उठाव झाल्याचं समोर आलं आहे. बलुचिस्तान स्वातंत्र्याच्या दिशेने पावलं टाकताना, पाकिस्तानी लष्कराने आपले काही तळ आणि चौक्या सोडून पळ काढला. काही वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
तुर्कीचे कार्गो विमान कराचीत
या साऱ्या घडामोडींमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुर्कीचे एक कार्गो विमान कराची विमानतळावर उतरल्याचं निदर्शनास आलं आहे. हे विमान ड्रोनसह लष्करी उपकरणे घेऊन आलं असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. जरी तुर्कीने मानवतावादी मदत असल्याचा दावा केला असला, तरी भारतविरोधी लढण्यासाठी तुर्कीने पाकिस्तानला मदत पुरवल्याची खात्रीलायक माहिती आहे.
पाकिस्तान कुठे कुठे तोंडावर आपटलं?
इस्लामाबाद ते कराची हादरले! भारताच्या INS विक्रांतची धमाकेदार एन्ट्री, पाकची हवा टाइट