अहमदाबाद विमान अपघाताचा पुण्यात दिसून आला परिणाम; दोन विमानांची उड्डाणं रखडली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 27 जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध आणखीनच ताणले गेले आहेत. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. त्यानंतर दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत. यातच आता भारत-पाक तणावाचा विमानसेवेला फटका मोठा फटका बसला आहे. तब्बल 430 विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील विमानतळ बंद असल्याने शनिवारी (दि.10) पर्यंत सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. याचा हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. भारतीय विमान कंपन्यांनी 430 उड्डाणे रद्द केली आहेत. तर पाकिस्तानी विमान कंपन्यांनी 147 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. संवेदनशील क्षेत्रे टाळण्यासाठी अनेक विमान कंपन्यांनी त्यांचे मार्ग बदलले आहेत, तर परदेशी विमान कंपन्या देखील सुरक्षित मार्गांवर उड्डाण करत आहेत. वाढत्या सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील 25 हून अधिक विमानतळ तात्पुरते बंद केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा निर्णय 10 मे पर्यंत लागू राहील. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) NOTAM (नोटिस टू एअरमन) जारी करून 27 विमानतळांवरील उड्डाणे स्थगित केली आहेत. यामध्ये लेह, चंदीगड, अमृतसर आणि जोधपूर सारख्या प्रमुख विमानतळांचा देखील समावेश आहे. या निर्णयामुळे सुमारे 430 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, जी देशातील एकूण नियोजित उड्डाणांच्या सुमारे 3 टक्के आहेत. इतरही काही विमानतळांवर याचा परिणाम झाला आहे.
कोणत्या विमानतळांवर झाला परिणाम?
बंद करण्यात आलेल्या विमानतळांमध्ये पंजाबमधील लेह, अमृतसर, चंदीगड, पटियाला आणि हलवारा यांचा समावेश आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला आणि धर्मशाळ,; राजस्थानमधील जोधपूर, बिकानेर, जैसलमेर आणि किशनगड, यामध्ये गुजरातमधील भुज, जामनगर, राजकोट, मुंद्रा, पोरबंदर, कांडला आणि केशोद यांचा समावेश आहे.
परदेशी विमान कंपन्याही बदलत आहेत मार्ग
या संवेदनशील क्षेत्रापासून वाचण्यासाठी सर्व विमान कंपन्यांनी त्यांच्या उड्डाणे रद्द केली आहेत किंवा त्यांचे मार्ग बदलले आहेत. बुधवारी सुमारे 250 उड्डाणे आधीच रद्द करण्यात आली होती. एअर इंडियाने सांगितले की, अमृतसरला जाणारी त्यांची दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे दिल्लीकडे वळवावी लागली. अमेरिकन एअरलाइन्सनेही दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणारी त्यांची फ्लाइट रद्द केली.