Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Railway: भारतीय रेल्वेचा कायापालट! २०२६-२७ मध्ये येणार सातव्या पिढीची रेल्वे इंजिने; जाणून घ्या पूर्ण प्लॅन

आजची सातव्या पिढीतील इंजिने (उदा. WAP-7) ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहेत. ही इंजिने ६,००० अश्वशक्तीपेक्षा (HP) जास्त ऊर्जा निर्माण करतात. ही इंजिने ताशी १३० ते १६० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहेत

  • By anuradha sagar
Updated On: Apr 09, 2026 | 04:30 PM
Indian Railway: भारतीय रेल्वेचा कायापालट! २०२६-२७ मध्ये येणार सातव्या पिढीची रेल्वे इंजिने; जाणून घ्या पूर्ण प्लॅन
Follow Us
Follow Us:
  • २०२६-२७ या आर्थिक वर्षात सुमारे ४९२ नवीन लोकोमोटिव्ह तयार करण्याचे नियोजन.
  • सातव्या पिढीचे WAP-7 आणि अमृत भारत एक्सप्रेस क्लास इंजिनांवर विशेष लक्ष.
  • रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायक आणि वेगवान करणे.
Indian Railway: भारतीय रेल्वे ही भारतातील जनतेसाठी एका ऐतिहासिक परिवर्तनाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. आज संपूर्ण भारतात दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करत आहेत. या प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने २०२६-२७ या आर्थिक वर्षात रेल्वेने ४९२ नवीन प्रवासी लोकोमोटिव्ह (इंजिने) तयार करण्याची मोठी योजना आखली आहे. यामध्ये प्रामुख्याने सातव्या पिढीतील प्रगत ‘WAP-7’ आणि ‘अमृत भारत’ क्लास इंजिनांचा समावेश असेल. दरम्यान, देशात रेल्वेची सुरुवात कशी झाली आणि पहिल्या पिढीपासून आतापर्यंत त्यांनी किती प्रगती केली आहे, याबद्दल जाणून घेऊया.

Public Interest Litigation: ‘जनहित याचिका आता रद्द करण्याची वेळ आलीय!’; केंद्र सरकार

भारताचा रेल्वे प्रवास १८५३ मध्ये साहिब, सिंध आणि सुलतान यांसारख्या वाफेवर चालणाऱ्या लोकोमोटिव्हने सुरू झाला. भारतात १६ एप्रिल १८५३ रोजी पहिल्यांदा रेल्वेची सुरूवात झाली. तेव्हाची स्थिती आजच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी होती. त्या काळातील रेल्वेची इंजिने कोळसा आणि पाण्यावर (वाफेवर) चालत असत. या इंजिनांतून प्रचंड धूर निघत असे आणि त्यांचा वेग अत्यंत कमी होता. प्रवास गोंगाटमय आणि कष्टदायक होता.

सुरुवातीच्या काळात रेल्वेचे डबे पूर्णपणे लाकडाचे बनलेले होते आणि सोयीसुविधांचाही अभाव होता. डब्यांचे दरवाजे बाहेरच्या बाजूला उघडत असत, जे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होते. १९०५ पर्यंत गाड्यांमध्ये पंख्यांची साधी सोयही नव्हती. उन्हाळ्यात डबे थंड ठेवण्यासाठी चक्क बर्फाच्या लाद्यांचा वापर केला जात असे.

आजची सातवी पिढी: ताकद आणि वेग

आजची सातव्या पिढीतील इंजिने (उदा. WAP-7) ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहेत. ही इंजिने ६,००० अश्वशक्तीपेक्षा (HP) जास्त ऊर्जा निर्माण करतात. ही इंजिने ताशी १३० ते १६० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहेत. तसेच, ही पूर्णपणे विजेवर चालणारी आणि प्रदूषणमुक्त इंजिने आहेत.

साखर निर्यात सुरूच राहणार, विक्री किंमत वाढविण्याचा विचार सुरू; केंद्राची महत्त्वपूर्ण माहिती

 

आधुनिक डबे: सुरक्षितता आणि आराम

आजचे LHB (Linke Hofmann Busch) आणि अमृत भारत क्लास डबे हे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत सक्षम आहेत. अलीकडील रेल्वेचे डबे स्टेनलेस स्टीलचे बनलेले असून ‘अँटी-टेलिस्कोपिक’ आहेत, म्हणजेच अपघाताच्या वेळी ते एकमेकांवर चढत नाहीत. तर व्हॅक्यूम टॉयलेट्स, वातानुकूलन आणि अपघातांपासून वाचवणारी *’कवच’ (Kavach) ही स्वदेशी सुरक्षा यंत्रणा यात बसवण्यात आली आहे.

भविष्यातील ध्येय: हायड्रोजन आणि एरोडायनॅमिक डिझाइन

भारतीय रेल्वे आता इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या डब्यांवर काम करत आहे. तसेच, हवेचा रोध कमी करण्यासाठी ‘WAP-7D’ सारखी एरोडायनॅमिक (वायुगतिकीय) डिझाइन असलेली इंजिने विकसित केली जात आहेत. या नवनवीन प्रयोगांमुळे भारतीय रेल्वे जागतिक स्तरावर एक नवीन ओळख निर्माण करण्यास सज्ज झाली आहे.

 

Web Title: Indian railways massive upgrade 7th generation locomotives to be rolled out in 2026 27

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Central Governement
  • Indian Railways

संबंधित बातम्या

हनिमून साजरा करण्यासाठी ट्रेनच्या बर्थवर केली रोमँटिक सजावट; Video Viral होताच रेल्वेने केली कडक कारवाई
1

हनिमून साजरा करण्यासाठी ट्रेनच्या बर्थवर केली रोमँटिक सजावट; Video Viral होताच रेल्वेने केली कडक कारवाई

WhatsApp च्या नव्या फिचरला भारत सरकारचा ब्रेक! केंद्र सरकारशी चर्चा संपेपर्यंत Username फिचर लाँच होणार नाही; Meta चे आश्वासन
2

WhatsApp च्या नव्या फिचरला भारत सरकारचा ब्रेक! केंद्र सरकारशी चर्चा संपेपर्यंत Username फिचर लाँच होणार नाही; Meta चे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.