Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले!” रायबरेली दौऱ्यावर राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘या’ मुद्द्यांवरून घेरले

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रायबरेली दौऱ्यात केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. महागाई आणि इंधन दरवाढीमुळे शेतकरी, तरुण आणि व्यापारी देशोधडीला लागल्याचा आरोप त्यांनी केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 19, 2026 | 04:34 PM
“महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले!” रायबरेली दौऱ्यावर राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘या’ मुद्द्यांवरून घेरले
Follow Us
Follow Us:

  • “महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले!”
  • रायबरेली दौऱ्यावर राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
  • ‘या’ मुद्द्यांवरून घेरले
रायबरेली: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवार (१९ मे) रोजी आपल्या रायबरेली दौऱ्यादरम्यान केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर आणि वाढत्या महागाईवर कडाडून टीका केली आहे. “पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असून, याचा थेट फटका देशातील आम जनतेला बसत आहे,” असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

खासदार निधीतून उभारलेल्या ‘बारातघर’चे उद्घाटन

रायबरेली येथील बछरावा विधानसभा मतदारसंघातील ‘ठकुराईन खेडा’ गावात खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या बारातघरचे (मंगल कार्यालय) उद्घाटन राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी देशातील सद्य आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. “देशातील नागरिक सध्या प्रचंड आर्थिक दडपणाखाली आहेत, मात्र सरकार जनतेच्या या समस्या गांभीर्याने घेत नाहीये,” असा आरोप त्यांनी केला.

शेतकरी, तरुण आणि छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान

भविष्यातील आर्थिक आव्हानांबद्दल इशारा देताना राहुल गांधी म्हणाले, “येणारा काळ आर्थिकदृष्ट्या अधिक आव्हानात्मक असू शकतो. याचा सर्वाधिक आणि थेट फटका शेतकरी, तरुण, मजूर आणि छोट्या व्यापाऱ्यांना बसणार आहे. सध्याच्या धोरणांमुळे कष्टकरी वर्गाची आर्थिक स्थिती कमकुवत होत चालली असून सरकारने त्यांना तातडीने दिलासा देणारे निर्णय घेण्याची गरज आहे.” तसेच, रायबरेलीच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“मोदीजी, देश तुम्हाला प्रश्न विचारतोय,” NEET पेपरफुटीवरून राहुल गांधी आक्रमक

‘बड्या मंगळवार’निमित्त चुरुवा मंदिरात दर्शन

रायबरेलीत प्रवेश करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी प्रसिद्ध चुरुवा मंदिरात जाऊन संकटमोचन बजरंगबलीचे दर्शन घेतले. ‘बडा मंगळवार’ (Bada Mangal) असल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. राहुल गांधी यांनी मंदिरात उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

लखनऊ विमानतळावर जंगी स्वागत

तत्पूर्वी, मंगळवारी सकाळी राहुल गांधी यांचे लखनऊ येथील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. तिथे उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय राय आणि ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर ते रस्ते मार्गाने रायबरेलीकडे रवाना झाले.

दोन दिवसीय दौऱ्यात रणनीतीवर भर

आपल्या या दोन दिवसीय दौऱ्यात राहुल गांधी जनसंवाद, महिला संवाद आणि काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक बैठकांमध्ये भाग घेणार आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी काळातील राजकीय रणनीती आणि उत्तर प्रदेशात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने राहुल गांधींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

NEET Paper leak Case: धर्मेंद्र प्रधान यांना त्वरित पदावरून हटवा, NEET पेपरफुटीवरून राहुल गांधी यांची मागणी

Web Title: Rahul gandhi criticizes central government over inflation during raebareli visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Central Governement
  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी
1

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
2

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Sanae Takaichi: आशियात नव्या शक्तीचा उदय! मोदींच्या भेटीसाठी ताकाइची भारतात; इंडो-पॅसिफिकमध्ये ‘असे’ फिरणार जागतिक राजकारण
3

Sanae Takaichi: आशियात नव्या शक्तीचा उदय! मोदींच्या भेटीसाठी ताकाइची भारतात; इंडो-पॅसिफिकमध्ये ‘असे’ फिरणार जागतिक राजकारण

मराठी रंगभूमीवरच्या बाईंसाठी पंतप्रधानांचे भावुक बोल! Vijaya Mehta यांच्या आठवणीत मोदींची पोस्ट
4

मराठी रंगभूमीवरच्या बाईंसाठी पंतप्रधानांचे भावुक बोल! Vijaya Mehta यांच्या आठवणीत मोदींची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.