Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IndiGo Flight Emergency Landing : इंडिगो विमानाचे इंजिन हवेतच बंद पडले अन् 224 प्रवासी …; इंजिनमध्ये बिघाड

IndiGo Flight Emergency Landing: कोलकाताहून चेन्नईला येणाऱ्या इंडिगोच्या 6E-723 विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये लँडिंगपूर्वी हवेतच बिघाड झाला. पायलटने तातडीने एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिल्यानंतर चेन्नई विमानतळावर ‘फुल इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली. विमानात 224 जण होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 12, 2026 | 12:29 PM
इंडिगो विमानाचे इंजिन हवेतच बंद पडले अन् 224 प्रवासी ...; इंजिनमध्ये बिघाड

इंडिगो विमानाचे इंजिन हवेतच बंद पडले अन् 224 प्रवासी ...; इंजिनमध्ये बिघाड

Follow Us
Follow Us:
  • चेन्नई विमानतळावर इंडिगो विमानाची इमर्जन्सी लँडिंग
  • चेन्नई विमानतळावर ‘फुल इमर्जन्सी’ घोषित
  • लँडिंगपूर्वी विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये बिघाड
IndiGo Flight Emergency Landing: चेन्नई विमानतळावर मंगळवारी (11 ऑगस्ट 2026) रात्री इंडिगोच्या विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगमुळे काही काळ खळबळ उडाली. कोलकाताहून चेन्नईकडे येणाऱ्या इंडिगोच्या 6E-723 विमानाच्या लँडिंगपूर्वी डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. विमानात 224 प्रवासी आणि क्रू सदस्य होते. इंजिनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानंतर पायलटने तातडीने एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली. त्यानंतर विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी चेन्नई विमानतळ प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था सक्रिय केली.

विमानतळावर ‘फुल इमर्जन्सी’

विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळताच चेन्नई विमानतळावर ‘फुल इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात आली. हे विमान रात्री 11:30 वाजता चेन्नई विमानतळावर पोहोचणे अपेक्षित होते. मात्र लँडिंगच्या तयारीदरम्यान डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे पायलटला समजले.

Rain Update : देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा; महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत…

रनवे 25 वर सुरक्षित लँडिंग

पायलटने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एटीसीला माहिती दिली. त्यानंतर विमानाने रात्री 11:37 वाजता रनवे क्रमांक 25 वर सुरक्षित लँडिंग केली. विमानातील सर्व 224 जण सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विमान सुरक्षितपणे उतरल्याने मोठा अनर्थ टळला. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर रात्री 11:47 वाजता ‘फुल इमर्जन्सी’ हटवण्यात आली. विमानतळावरील इतर कामकाजावर या घटनेचा मोठा परिणाम झाला नाही आणि सर्व सेवा सामान्यपणे सुरू राहिल्या.

एअर इंडियाच्या टर्बुलन्स घटनेनंतर विमान सुरक्षेवर चर्चा

इंडिगोच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर विमान सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला हवेत तीव्र टर्बुलन्सचा सामना करावा लागला होता. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर झालेल्या तपासात पायलटच्या वैद्यकीय/ड्रग टेस्टशी संबंधित गंभीर बाब समोर आल्याचे वृत्त आहे. अहवालानुसार संबंधित पायलटने गांजाचे सेवन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, दोन्ही पायलट्सना तपास पूर्ण होईपर्यंत उड्डाणाच्या ड्युटीपासून दूर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची एअर इंडियासोबत बैठक

दरम्यान, एअर इंडियाच्या सुरक्षाविषयक बाबींवर मंगळवारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एअर इंडियाचे CEO कॅम्पबेल विल्सन यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला नागरी विमान वाहतूक सचिव समीर कुमार सिन्हा, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) महासंचालक वीर विक्रम यादव आणि Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) चे महासंचालक जी.व्ही.जी. युगंधर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एअर इंडियाच्या बाजूने टाटा समूहाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच एअर इंडियाचे फ्लाइट सेफ्टी प्रमुखही बैठकीत सहभागी झाले होते.

फुकेत-दिल्ली विमानाच्या घटनेबाबत स्पष्टीकरण मागवले

सूत्रांच्या माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ४ ऑगस्ट रोजी घडलेल्या फुकेत-दिल्ली विमानाच्या घटनेबाबत एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी बोलावले होते. या घटनेत एअर इंडियाच्या A320neo विमानाचा समावेश होता. विमान थायलंडमधील फुकेत येथून दिल्लीकडे येत होते. एकीकडे चेन्नई विमानतळावर इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होऊनही विमान सुरक्षित उतरले, तर दुसरीकडे एअर इंडियाच्या अलीकडील टर्बुलन्स घटनेमुळे विमान कंपन्यांच्या फ्लाइट सेफ्टी प्रोटोकॉलवर प्रशासनाचे लक्ष अधिक केंद्रित झाले आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणजे ‘बिघडलेले शहजादे’! गृहमंत्री संसदेत येताच…; भाजप खासदाराचा घणाघात

Web Title: Indigo flight emergency landing chennai airport engine failure 224 passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • delhi
  • flight
  • IndiGo

संबंधित बातम्या

१५ ऑगस्टपूर्वी Delhi High Alert वर; इंडियन मुजाहिदीन, अल-कायदा, खलिस्तानी संघटनांशी संबंधित १९ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर
1

१५ ऑगस्टपूर्वी Delhi High Alert वर; इंडियन मुजाहिदीन, अल-कायदा, खलिस्तानी संघटनांशी संबंधित १९ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर

NUCFDC Headquarter : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! NUCFDC चे मुख्यालय मुंबईत होणार; अमित शाह यांची घोषणा
2

NUCFDC Headquarter : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! NUCFDC चे मुख्यालय मुंबईत होणार; अमित शाह यांची घोषणा

Narendra Modi: ‘मी बाबा बागेश्वर नाही…’, IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदींचा मिश्कील अंदाज
3

Narendra Modi: ‘मी बाबा बागेश्वर नाही…’, IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदींचा मिश्कील अंदाज

Dabur FSSAI Ban: डाबर कंपनीला दिल्ली हायकोर्टाकडून मोठा दिलासा! FSSAI च्या बंदीच्या आदेशाला स्थगिती, ‘या’मुळे मिळाली सवलत
4

Dabur FSSAI Ban: डाबर कंपनीला दिल्ली हायकोर्टाकडून मोठा दिलासा! FSSAI च्या बंदीच्या आदेशाला स्थगिती, ‘या’मुळे मिळाली सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.