तांत्रिक कारणांमुळे गगनयान मोहिमेचं चाचणी उड्डाण रोखलं, इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी दिली माहिती!

TV-D1 लाँच करण्यासाठी 10-0 काउंटडाऊन पर्यंत का सुरू झालं होतं. मात्र, पाचला पोचल्यावर एक होल्ड होता. यावेळी रॉकेटमधून धूर निघताना दिसला. त्यामुळे चाचणी उड्डाण होल्डवर ठेवण्यात आलं आहे.

    भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचं (ISRO) आज श्रीहरिकोटा येथून गगनयान मिशन (Gaganyaan mission) चं पहिलं चाचणी उड्डाण करणार होतं. आधी निर्धारित वेळेनुसार आज सकाळी ८ वाजता गगनयान मोहिमेसाठी चाचणी उड्डाण TV-D1 प्रक्षेपित करण्यात येईल असं सांगण्यात येत होतं. मात्र, त्यानंतर खराब हवामान असल्याचं सांगत हे चाचणी उड्डाण 30 मिनिटांनी वाढवण्यात आलं होतं. चाचणी मोहीम सकाळी 8:45 वाजता सुरू होणार होतं. मात्र, सध्याच्या इस्रोनं दिलेल्या अपडेट नुसार, (Gaganyaan Mission update) काही तांत्रिक कारणांमुळे गगनयान मोहिमेचं चाचणी उड्डाण आज होऊ शकणार नाही आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ (ISRO chief Somnath) यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

    इस्रो प्रमुखांनी काय सांगितलं

    मानवयुक्त गगनयान मोहिमेच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, इस्रोने क्रू मॉड्यूल सुरक्षितपणे उतरवण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्या दृष्टीने आज सकाळपासून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात (SDSC) तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र,  इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ (ISRO chief Somnath) यांनी माहिती दिली की, मिशन गगनयान आज थांबवण्यात येत आहे.  मिशन कंट्रोल कॉम्प्युटरने स्वयंचलित प्रक्षेपण क्रमादरम्यान होल्ड दर्शविला. आम्ही TV-D1 चे लॉन्च काही काळासाठी पुढे ढकलत (Gaganyaan mission On Hold) आहोत. आम्ही रॉकेट जवळ जाऊ आणि समस्या काय आहे ते पाहू. आम्ही ते लवकरच सुरू करू. असं त्यांनी सांगितलं.

    10-0 च्या काउंटडाउन दरम्यान होल्ड

    TV-D1 लाँच करण्यासाठी 10-0  काउंटडाऊन पर्यंत का सुरू झालं  होतं. मात्र, पाचला पोचल्यावर एक होल्ड होता. यावेळी रॉकेटमधून धूर निघताना दिसला. त्यामुळे चाचणी उड्डाण होल्डवर ठेवण्यात आलं आहे.