Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब लग्नाची, गजब कहाणी! दोन खुनी अन् जेलमध्ये जडलं प्रेम… विवाहासाठी कोर्टाने दिला पॅरोल; 15 दिवस राहणार बाहेर

अलवर जिल्ह्यातील अनोखी घटना समोर आली आहे. वेगवेगळ्या हत्या प्रकरणांत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली प्रिया सेठ आणि हनुमान प्रसाद यांना हायकोर्टाच्या आदेशानंतर पॅरोलवर तुरुंगाबाहेर येऊन विवाह करण्याची परवानगी मिळाली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 24, 2026 | 01:00 PM
अजब लग्नाची, गजब कहाणी! दोन खुनी अन् जेलमध्ये जडलं प्रेम... विवाहासाठी कोर्टाने दिला पॅरोल; 15 दिवस राहणार बाहेर

अजब लग्नाची, गजब कहाणी! दोन खुनी अन् जेलमध्ये जडलं प्रेम... विवाहासाठी कोर्टाने दिला पॅरोल; 15 दिवस राहणार बाहेर

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रिया सेठ आणि हनुमान प्रसाद हे वेगवेगळ्या हत्या प्रकरणांतील मुख्य आरोपी असून सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
  • लग्नासाठी दोघांनाही विशेष पॅरोल मंजूर करण्यात आली, त्यानंतर हा विवाह सोहळा पार पडला.
  • प्रियाचा खंडणी आणि हत्या प्रकरणातील सहभाग तसेच हनुमानने संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याची पार्श्वभूमी असल्याने हा विवाह देशभर चर्चेचा विषय ठरला आहे.
अलवर जिल्ह्यातील बडोदा मेव हे छोटेसे शहर गुरुवारी एका आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यामुळे चर्चेत आले. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली प्रिया सेठ आणि हनुमान प्रसाद हे दोघेही येथे विवाहबंधनात अडकले, हायकोर्टाच्या आदेशानंतर या दोघांना लग्नासाठी पॅरोल मिळाला आहे. विशेष म्हणजे, हे दोघेही वेगवेगळ्या हत्या प्रकरणांतील मुख्य आरोपी असून सध्या जन्मठेपची शिक्षा भोगत आहेत.

प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठा घातपात टळला? हाय सिक्युरिटी परिसरातून संशयित कार जप्त; महिलेला अटक

प्रियकराचे कर्ज फेडण्यासाठी थरार

पाली जिल्ह्याची रहिवासी असलेल्या प्रिया सेठने तिचा प्रियकर दीक्षांत कामरा याचे कर्ज फेडण्यासाठी झोटवाडा येथील दुष्यंत शर्माला ‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २ मे २०१८ रोजी प्रियाने दुष्यंतला भेटीसाठी बोलावून फ्लॅटवर नेले, तिथे दीक्षांत आणि त्याचा मित्र लक्ष्य वालिया आधीपासून हजर होते. या तिघांनी दुष्यंतला ओलीस ठेवून त्यात्त्या वडिलांकडे १० लाखांची खंडणी मागितली. वडिलांनी ३ लाख रुपये दुष्यंतच्या खात्यात जमा केले. मात्र, दुष्यंतला सोडल्यास आपण पकडले जाऊ या भीतीने तिघांनी त्याची गळा आवळून हत्या केली.

जयपूरमध्ये लागली चुकीची संगत

प्रिया सेठ ही सुशिक्षित कुटुंबातील आहे. तिचे आजोबा प्राचार्य होते, वडील कॉलेज लेक्चरर आणि आई शिक्षिका आहे. दहावी-बारावीत उत्तम गुण मिळाल्यामुळे पालकांनी तिला पुढील शिक्षणासाठी जयपूरला पाठवले होते. मात्र, तिथे ती चुकीच्या मार्गाला लागली. महागड्या छंदापायी तिने तरुणांना जाळ्यात ओढणे सुरू केले. याच दरम्यान तिची ओळख मॉडेलिंग करणाऱ्या दीक्षांतशी झाली आणि ते लिव्ह-इन मध्ये राहू लागले.

दुष्यंतने स्वतःला करोडपती सांगितले

दुष्यंतने प्रियाला डेटिंग ॲपवर आपण दिल्लीचे असून करोडपती असल्याचे सांगितले होते. याच संपत्तीच्या मोहाने प्रियाने त्याचा बळी घेण्याचा कट रचला.

आता याला काय म्हणावं? 60 फूट लांब पूल रातोरात चोरीला; पोलिसांनीही डोक्याला लावला हात

नवरदेव हनुमान प्रसादचा इतिहास

नवरदेव हनुमान प्रसाद याने २ ऑक्टोबर २०१७ रोजी शिवाजी पार्क येथे तायक्वांदो खेळाडू संतोष शर्मा हिचा पती बनवारी लाल आणि त्यांच्या चार मुलाची हत्या केली होती, हत्येनंतर तो उदयपूरला पळून गेला, तपासात असे समीर आले की, संतीष आणि हनुमान यांचे प्रेमसंबंध होते, संतोष हनुमानपेक्षा १० वर्षांनी मोठी होती. प्रेमापोटी संतोषने आपल्या पतीला आणि मुलांना वाटेतून दूर करण्यासाठी हनुमानला सागितले होते.

 

Web Title: Life term prisoners tie knot after high court parole in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • crime
  • rajasthan
  • Wedding

संबंधित बातम्या

Bihar Crime: थरकाप उडवणारी घटना! नगरसेवकाच्या मुलाने अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून जाळले जिवंत
1

Bihar Crime: थरकाप उडवणारी घटना! नगरसेवकाच्या मुलाने अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून जाळले जिवंत

Satara Crime: अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; आधी दगडाने ठेचले, नंतर मृतदेहाचे तुकडे करून…
2

Satara Crime: अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; आधी दगडाने ठेचले, नंतर मृतदेहाचे तुकडे करून…

Nagpur Crime : OYO हॉटेलमध्ये वाद आणि निर्घृण हत्या; प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार
3

Nagpur Crime : OYO हॉटेलमध्ये वाद आणि निर्घृण हत्या; प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार

Buldhana Crime: धक्कादायक! गणित चुकल्याने चौथीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू
4

Buldhana Crime: धक्कादायक! गणित चुकल्याने चौथीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.