आता याला काय म्हणावं? 60 फूट लांब पूल रातोरात चोरीला; पोलिसांनीही डोक्याला लावला हात (संग्रहित फोटो)
रायपूर : छत्तीसगडमधील कोरबामध्ये एक अजब अन् डोक्याला हात लावावा असा प्रकार घडला आहे. या भागातील सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात एक ६० फूट लांब लोखंडी पूल चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली आहे. ही तक्रार कलेक्टर कुणाल दुदावत आणि एसपी सिद्धार्थ तिवारी यांच्याकडे करण्यात आली. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. पोलिसांनी त्वरित याचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केले.
छत्तीसगडमधील कोरबा येथे शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या कालव्यावर अनेक वर्षापूर्वी एक लोखंडी पूल तयार करण्यात आला होता. हा पूल एका रात्रीत चोरी झाली आहे. नगरपालिकेच्या वॉर्ड नंबर १७ मध्ये नागरिकांना येण्याजाण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी हा पूल जवळपास ४० वर्षापूर्वी तयार केला होता. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, या पुलाची चोरी शहरात सक्रिय असलेल्या स्क्रॅप माफियांनी केली आहे. चोरी झालेल्या पुलाचे वजन जवळपास २५ ते ३० टन असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ३० टन लोखंड असलेलया या पुलाची बाजारभावाने किंमत ही १५ लाखाच्या आसपास होते.
हेदेखील वाचा : शेतकरी कर्जमाफीवर कृषिमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा; शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळणार, 30 मार्चपूर्वी…
दरम्यान, या स्क्रॅप माफियांना आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी एक एसआयटी स्थापन केली आहे. कोरबा जिल्ह्यातील पोलिसांनी या भागातील स्क्रॅप व्यवसाय बंद झाल्याचा दावा केला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ठिकठिकाणी स्क्रॅपची ही दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. आता वॉर्ड क्रमांक १७ मधील ६० फूट लांब पूल चोरीला गेल्याने पोलिसांचा हा दावा किती खोटा आहे हे सिद्ध झाले आहे. पोलिसांनी शहरातील दोन स्क्रॅप ठिकाणांवर कारवाईदेखील केली. मात्र, त्यांच्या हाती काही लागलेले नाही.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : सत्तेसाठी काय पण? निवडणुकीत कट्टर विरोधक येणार एकत्र; इंदापूरचा विषय काय?
पुण्यात डॉक्टरला कोयत्याच्या धाकाने लुटले
दुसऱ्या एका घटनेत, शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे पुणे–नगर महामार्गावर सहलीसाठी निघालेल्या डॉक्टरांना कोयत्याच्या धाकाने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात तिघा चोरट्यांविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.






