आज लोकसभेचा निकाल समोर येणार आहे. कोणते सरकार स्थापन होईल हे आज समजणार. दरम्यान लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 2024 मध्ये मोदी पुन्हा सत्तेवर आले तर पंतप्रधान मोदी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करू शकतात, जे सलग तीन वेळा निवडून आलेले भारताचे एकमेव पंतप्रधान होते.
[read_also content=”दुपारी 12 वाजेपर्यंत एनडीए 300 च्या खाली! इंडिया आघाडीवर तर भाजपला फोडला घाम https://www.navarashtra.com/india/rahul-gandhi-is-leading-in-wayanad-along-with-raebareli-nrka-542385.html”]
पंडित जवाहरलाल नेहरू 1947 ते 1964 अशी 17 वर्षे पंतप्रधान होते. लोकसभेच्या वेबसाइटवरती असलेल्या माहितीनुसार, ते देशातील सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी राहिलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 1957 च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या काँग्रेसने 371 जागा जिंकल्या होत्या, जेव्हा नेहरू 1951 मध्ये पहिल्या निवडणुकांनंतर सत्तेत परतले होते.
तर 1 जून रोजी समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपची सत्ता पुन्हा येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. एक्झिट पोलवर विश्वास ठेवसा तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन होऊ शकते. यामुळे भाजप आघाडीला 300 पेक्षा जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणत्याही एका राजकीय पक्षाने जिंकलेल्या सर्वाधिक (371) होत्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना सुमारे 350-370 जागा मिळतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. ही निवडणूक पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे. अशा परिस्थितीत आज (मंगळवार, 4 जून) जाहीर होणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणता राजकीय पक्ष किंवा युती सरकार स्थापन करणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा केंद्रात परतणार का? हे स्पष्ट होणार आहे.
ओडिशा आणि आंध्र प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसोबतच दोन्ही राज्यांच्या विधानसभेसाठीही मतदान झाले. सध्याच्या आंध्र प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ 11 जून आणि ओडिशाचा 24 जून आहे. दोन्ही राज्यांतील विधानसभा मतदारसंघांनी पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी मतदान केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) यांच्या नेतृत्वाखालील पक्ष 2024 च्या निवडणुकीत 400 हून अधिक मते मिळवून ऐतिहासिक विजय मिळवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने व्यक्त केला आहे. लोकसभेचे एकूण 543 सदस्य आहेत. कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी 272 मतांची आवश्यकता असते.