Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Faded wheel ईव्हेंट... विंचेस्टर राफेल रेज गन स्किन मिळणार मोफत, फॉलो करा 'या' स्टेप्स
फ्री फायर मॅक्स भारताचा एक लोकप्रिय मोबाईल गेमिंग आहे. या गेममध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन नवीन ईव्हेंट्स लाईव्ह होत आहेत. या ईव्हेंट्समध्ये सहभागी होऊन प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. सध्या गेममध्ये एक नवीन फेडेड व्हिल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये एकूण 10 रिवॉर्ड्स उपलब्ध असतात. मात्र प्लेअर्सना यापैकी केवळ 8 रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. प्लेअर्स 8 वेळा स्पिन करून 8 रिवॉर्ड्स मिळवू शकतात. यासाठी इन गेम करंसी डायमंड्स खर्च करावे लागतात. (फोटो सौजन्य – YouTube)
फेडेड व्हिल ईव्हेंटमध्ये 8 वेळा स्पिन केले जाऊ शकते. प्रत्येक स्पिनची किंमत वेगळी आहे. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागतात तर दुसऱ्या स्पिनची किंमत 19 डायमंड्स आहेत. तिसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 39 डायमंड्स खर्च करावे लागतात. चौथ्या स्पिनची किंमत 69 डायमंड्स, पाचव्या स्पिनची किंमत 99 डायमंड्स आणि सहाव्या स्पिनची किंमत 149 डायमंड्स आहे. सातव्यांदा आणि आठव्यांदा स्पिन करण्यासाठी अनुक्रने 199 डायमंड्स आणि 499 डायमंड्स खर्च करावे लागतात.






