रामनगरी अयोध्येत आज रामनवमी (Ramnavami 2024) साजरी होत आहे. नवीन भव्य राम मंदिरात भगवान श्री राम जन्मोत्सव साजरा होत आहे. आज दुपारी 12 वाजता राम मंदिरात रमालल्लाचा सुर्यभिषेक करण्यात आला. या सुर्यभिषेकासाठी गर्भगृहात खास साधनांचा वापर करण्यात आला होता. सूर्याची किरणं रामलल्लाच्या कपाळावर पडताच त्यांचं कपाळ उजळलं. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट यांनी या भव्यदिव्य सोहळ्याचे फोटो एक्सवर शेअर केले आहेत. बघुयात कसा पार पडला रामलल्लाचा सुर्यभिषेक.
[read_also content=”शुटींग दरम्यान जखमी झाली प्रियंका चोप्रा? रक्त लागलेल्या चेहऱ्याचा फोटो पाहून फॅन्स चिंतेत! https://www.navarashtra.com/movies/priyanka-chopra-sustains-facial-bruises-while-shooting-for-heads-of-state-bloodied-up-pictures-from-work-nrps-524614.html”]
आज सकाळच्या सुमारास सुर्यभिषेकाआधी रामललाचा दिव्य श्रृंगार करण्यात आला होता. दुपारी बारा वाजता सुर्यभिषेक करण्यात आला. यासाठी रुरकी आयआयटीच्या मदतीने खास प्रणाली तयार करण्यात आली. यासाठी रुरकी आयआयटीच्या शास्त्रज्ञांच्या चमूने गर्भगृहात अनेक आरसे आणि लेन्स लावले होते. सूर्यकिरणे एका आरशावर आदळल्यानंतर पितळी पाईपच्या साहाय्याने दुसऱ्या आरशाकडे गेली. यानंतर दुसऱ्या आरशावर आदळल्यानंतर तो तिसऱ्या आरशाकडे गेला. आणि आरशावर आदळल्यानंतर सूर्याची किरणे थेट पाईपच्या तोंडातून बाहेर पडली आणि राममालाच्या कपाळावर पोहोचली. यानंतर पाच मिनिटे रामललाची सूर्य टिळक पूजा करण्यात आली.
#WATCH | ‘Surya Tilak’ illuminates Ram Lalla’s forehead at the Ram Janmabhoomi Temple in Ayodhya, on the occasion of Ram Navami.
(Source: DD) pic.twitter.com/rg8b9bpiqh
— ANI (@ANI) April 17, 2024
रामजन्मोत्सवासोबतच धण्याचे महत्त्वही सांगितले जाते. साधारणपणे पिठापासून बनवलेल्या पंजिरीची परंपरा आहे, मात्र रामजन्मोत्सवानिमित्त सुक्या धण्याचं पीठ घालून बनवलेली पंजिरी प्रसाद म्हणून वाटली जाते. जगद्गुरू रामानुजाचार्य स्वामी रत्नेश प्रपन्नाचार्य यांच्या मते त्यात रामजन्मोत्सवाचा गोडवा मिसळलेला आहे. औषधी गुणधर्म असलेले धणे बाळासाठी आणि आईसाठी फायदेशीर मानली जाते.