Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मोदी गॅरंटी’वरून काँग्रेस अध्यक्षांनी पुन्हा साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाले…

17 जुलै 2020 रोजी पंतप्रधानांनी देशाला 'मोदींची गॅरंटी' दिली होती की, 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर छत असेल. पण आता पंतप्रधान 3 कोटी घरे देण्याची बढाई मारत आहेत, जणू त्यांनी आधीची हमी पूर्ण केली आहे. मो

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 12, 2024 | 07:52 AM
‘मोदी गॅरंटी’वरून काँग्रेस अध्यक्षांनी पुन्हा साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाले…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या देशात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. देशातील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात 3 कोटी घरे बांधण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. मोदींची ‘गॅरंटी’ पोकळ निघाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

17 जुलै 2020 रोजी पंतप्रधानांनी देशाला ‘मोदींची गॅरंटी’ दिली होती की, 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर छत असेल. पण आता पंतप्रधान 3 कोटी घरे देण्याची बढाई मारत आहेत, जणू त्यांनी आधीची हमी पूर्ण केली आहे. मोदी सरकारला इतर लोकांच्या घरातून खुर्चा उधार घेऊन सत्तेचे ‘घर’ सांभाळावे लागले.

तसेच देशाला वास्तव माहिती आहे. मंत्रिमंडळाने 3 कोटी नवीन घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी या 3 कोटी घरांसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही, कारण भाजपने गेल्या 10 वर्षांत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएपेक्षा 1.2 कोटी कमी घरे बांधली आहेत.

खर्गे पुढे म्हणाले की, 2004 ते 2013 दरम्यान काँग्रेसने 4.5 कोटी घरे बांधली. तर 2014 ते 2024 या कालावधीत केवळ 3.3 कोटी घरे बांधता आली आहेत. जनतेने मोदींच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत 49 लाख शहरी घरे म्हणजे 60% घरांसाठी बहुतेक पैसे स्वतःच्या खिशातून भरले आहेत. सरकारी मूलभूत शहरी घराची किंमत सरासरी 6.5 लाख रुपये आहे. त्यात केंद्र सरकार केवळ दीड लाख रुपये देते. यामध्ये राज्ये आणि नगरपालिकांचा वाटा 40% आहे. त्याचाही 60% भार जनतेने उचलला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Mallikarjun kharge once again targeted pm narendra modi over modi guarantee issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2024 | 07:50 AM

Topics:  

  • Congress
  • Mallikarjun Kharge
  • narendra modi
  • political news

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
3

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
4

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.