Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrikant Shinde: अरे ऐकून घे ना राहुल, का ओरडतोय…; लोकसभेत श्रीकांत शिंदे कडाडले अन् क्षणार्धात वातावरण… पाहा Video

Shrikant Shinde Lok Sabha Speech: लोकसभेत श्रीकांत शिंदे यांनी NEET परीक्षा वर्षातून २ वेळा घेण्याची मागणी केली. भाषणादरम्यान गदारोळ करणाऱ्या विरोधकांना "अरे राहुल, माझं ऐक!" असे सुनावल्याने संसदेत वातावरण तापले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 28, 2026 | 07:26 PM
Shrikant Shinde: अरे ऐकून घे ना राहुल, का ओरडतोय…; लोकसभेत श्रीकांत शिंदे कडाडले (Photo Credit- X)

Shrikant Shinde: अरे ऐकून घे ना राहुल, का ओरडतोय…; लोकसभेत श्रीकांत शिंदे कडाडले (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • अरे ऐकून घे ना राहुल, का ओरडतोय…
  • लोकसभेत श्रीकांत शिंदे कडाडले अन् क्षणार्धात वातावरण…
  • पाहा Video
Lok Sabha: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६’ वरून लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये तुफान खडाजंगी पाहायला मिळाली. या विधेयकावरील चर्चेदरम्यान शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी नीट (NEET) परीक्षा पद्धतीत क्रांतिकारी बदल सुचवत ही परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात यावी, अशी महत्त्वाची मागणी केली. दरम्यान, आपल्या भाषणादरम्यान विरोधी पक्षांच्या सततच्या गदारोळामुळे संतापलेल्या श्रीकांत शिंदे यांनी थेट “अरे राहुल, माझं ऐक!” असा टोला लगावल्याने सभागृहात अचानक राजकीय वातावरण तापले.

NEET परीक्षा वर्षातून दोनदा घ्या

लोकसभेत बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की, सध्या ‘नीट’ परीक्षा वर्षातून फक्त एकदाच घेतली जाते. यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची काही कारणास्तव परीक्षा चुकल्यास किंवा गुण कमी पडल्यास त्यांचे संपूर्ण एक वर्ष वाया जाते. अमेरिकेसह अनेक विकसित देशांमधील प्रवेश परीक्षांचा संदर्भ देत शिंदे म्हणाले, “परदेशात वर्षातून दोन किंवा त्याहून अधिक वेळा प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्याच धर्तीवर भारतातही विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा ‘नीट’ परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी होईल आणि वर्ष वाया जाणार नाही.”

पाहा व्हिडिओ

Priyanka Gandhi: विद्यार्थी काय दहशतवादी होते का? लोकसभेत प्रियंका गांधींचा थेट पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर हल्लाबोल!

लोकसभेत श्रीकांत शिंदे कडाडले

डॉ. श्रीकांत शिंदे सभागृहात ‘नीट’ सुधारणांवर बाजू मांडत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिंदे काहीसे संतापले आणि अधिक आक्रमक होत त्यांनी थेट “अरे राहुल, माझं ऐक! तू का ओरडतो आहेस?” असे म्हणाले. त्यांनी ‘राहुल’ नाव घेताच विरोधी पक्षाचे खासदार राहुल गांधींच्या उल्लेखावरून अधिकच आक्रमक झाले. मात्र, परिस्थिती हाताळत श्रीकांत शिंदे मिश्किलपणे हसले आणि म्हणाले, “अरे बाबा, मी मागच्या राहुलशी बोलतोय. मी खासदार राहुल पासवानशी बोलतोय!” त्यांच्या या समयसूचक आणि मिश्किल उत्तराने सभागृहात एकच हशा पिकला आणि वातावरण शांत झाले.

परीक्षा सुधारणा विधेयकावरून राजकारण तापले

नीट पेपरफुटीच्या घटनांनंतर देशभरात पसरलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने परीक्षांमध्ये कडक पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी हे सुधारणा विधेयक २०२६ सादर केले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुचवलेल्या ‘वर्षातून दोनदा नीट परीक्षा’ आणि ‘त्वरित निकाल’ या व्यावहारिक मागण्यांचा समावेश शिक्षण मंत्रालय नवीन नियमावलीत करते का, याकडे आता देशातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

‘विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीचार्ज विसरणार नाही; गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे’; लोकसभेत Gaurav Gogoi यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Web Title: Shrikant shinde demands neet exam twice a year in lok sabha marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • BJP
  • CJP Protest
  • Congress
  • Dr Shrikant shinde
  • Monsoon Session
  • neet paper leak
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?
1

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल
2

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
3

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
4

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.