नवी दिल्ली : लग्न झालेली व्यक्ती नात्यातीलचं व्यक्तीच्या प्रेमात पडून बायको मुलांना सोडून पळून गेल्याच्या अनेक घटना आतपर्यंत आपल्या ऐकण्यात, वाचण्यात आल्या असतीलचं. ‘प्रेमात सर्व काही माफ असतं’ या अविर्भावात हे प्रेमवीर अनेकदा मागचा पुढचा विचार न करता सगळं सोडून त्या व्यक्ती घेऊन निघून जातात. मात्र, हरयाणातील कर्नालमध्ये (Haryana News) एका पठ्ठ्यानं जो प्रताप केलाय तो ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. येथील एका व्यक्तीनं आपली पत्नी आणि 4 मुलांना सोडून चक्क सख्ख्या मेहुणीसोबतच पळ (Man Ran Away With Sister-In-Law) काढल्याची घटना उघडकीस आली आहे. जिच्यासोबत हा पठ्ठ्या पळाला, त्या मेहुणीलाही पाच मुलं आहेत. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना धक्का बसला असून त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
[read_also content=”भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, अटल सेतूबद्दल जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी! https://www.navarashtra.com/maharashtra/indias-longest-sea-bridge-inaugurated-by-prime-minister-modi-in-mumbai-nrps-497536.html”]
हरियाणाच्या कर्नालमध्ये घडलेल्या या घटनेनं अनेकांना हैराण केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलीम नावाचा तरुण हा तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील फारुखाबादचा रहिवासी आहे. सलीम त्याच्या मेहुणीच्या प्रेमात पडला. दोघांनी मिळून पळून जात वेगळा संसार थाटण्याचा निर्णय घेतल. महत्त्वाचं म्हणजे आरोपी तरुणाला 4 मुलं आहेत तर, त्या मेहुणीलाही 5 मुलं आहेत. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, मेहुणीला घेऊन पसार झालेल्या तरुणाची पत्नी पाचव्यांदा गरोदर आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी मुळचा उत्तर प्रदेशातील फरुखाबादचा राहणारा आहे. कर्नालच्या घरोंड्यातील एका गावात आरोपी आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याला चार मुलं असून त्याची पत्नी आता पाचव्यांदा गरोदर आहे. पत्नीची काळजी घेण्यासाठी आरोपी मेहुणीला आणायला तिच्या घरी गेला. तिनं वारंवार बहिणीकडे जाण्यासाठी विरोध केला, मात्र कुटुंबीयांनी जबरदस्तीनं तिला आरोपीसोबत बहिणीची काळजी घेण्यासाठी पाठवलं. पत्नीची काळजी घेण्यासाठी आलेल्या मेहणीचे आरोपी तरुणासोबतच सूत जुळले आणि दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.
आता 6 ते 7 दिवस झाले असून पसार झालेल्या आरोपी आणि महिलेबाबत कोणतीच माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. पोलिसांसोबतच कुटुंबीयही दोघांचा शोध घेत आहेत. तसेच, पोलिसांचं म्हणणं आहे की, लवकरच दोघांनाही पकडलं जाईल, असा दावा वारंवार पोलिसांकडून केला जात आहे.






