
Top Marathi News Today Live : मोंथा चक्रीवादळाचा देशातील अनेक राज्यांना फटका; पिकेही झाली नष्ट
Marathi Breaking News Updates : मोंथा चक्रीवादळामुळे परिस्थिती बिघडताना दिसत आहे. या चक्रीवादळाचा देशातील अनेक राज्यांना फटका बसला आहे. आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मोंथा चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेशात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आणि १५०००० एकरवरील पिके उद्ध्वस्त झाली. या चक्रीवादळाचा परिणाम तेलंगणा, ओडिशा आणि पश्चिम बंगालसह इतर अनेक राज्यांमध्येही झाला.
आंध्र किनाऱ्यावर मंगळवारी रात्री उशिरा धडकल्यानंतर मोंथा चक्रीवादळाची तीव्रता कमी दिसून आली. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली, घरे कोसळली आणि रस्ते पाण्याखाली गेले, ज्यामुळे वीजपुरवठा आणि वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, हवामान खात्याने आंध्र प्रदेश आणि उत्तर किनारपट्टीच्या काही भागात दोन दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
30 Oct 2025 06:38 PM (IST)
मुंबई: राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात सवलतीचा लाभ देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून यामुळे पशुपालकांना वीज दर सवलतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसायाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लागणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
30 Oct 2025 06:13 PM (IST)
मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत असून, गुरुवारी मुंबईतील पवई येथील रा स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने १५ ते २० मुलांना ओलीस ठेवले होते. दरम्यान या प्रकरणात पवई पोलिसांनी मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटर केला आहे. पोलिस आणि आरोपी यांच्यात चकमक झाली. यामध्ये पोलिसानी त्याचा एन्काउंटर केला आहे.
30 Oct 2025 05:59 PM (IST)
एसटी ही महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ आहे . दररोज लाखो सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासी सेवेचा लाभ घेतात. त्यांना सुरक्षित आणि सौजन्यशील सेवा देणे हे एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. परंतु काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने एसटीच्या सुरक्षा व दक्षता खात्याला तातडीने मोहीम राबवून अशा मद्यपी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यभरात एकाच वेळी कोणतीही पूर्वकल्पांना न देता कडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणी मोहिमेत सापडलेल्या मद्यपी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.
30 Oct 2025 05:08 PM (IST)
मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत असून, गुरुवारी मुंबईतील पवई येथील रा स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने १५ ते २० मुलांना ओलीस ठेवले होते. हा माणूस स्टुडिओमध्ये काम करतो अशी माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांनी सर्व मुलांची सुटका केली असून आरोपीला ताब्यात घेतले.सर्व मुलांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे.
30 Oct 2025 05:05 PM (IST)
प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या मागण्यासांठी रस्त्यावर उतरले आहेत. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला. हजारो शेतकरी आणि कार्यकर्त्यांसह बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे महायुती सरकारला देखील घाम फोडला. यानंतर मागण्या मान्य न केल्यास रेल्वे रोको करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. मात्र न्यायालयाने दणका दिल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला आहे.
30 Oct 2025 04:55 PM (IST)
अंबरनाथच्या प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर किरण शिंदे यांना त्यांच्या पतीने खलबत्त्यानं डोक्यात जीवघेणी मारहाण केलीये. यानंतर किरण शिंदे यांना बदलापूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीये.
30 Oct 2025 04:50 PM (IST)
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी-कांबळीवाडी समुद्रकिनारी आज भला मोठा व्हेल मासा कुजलेल्या अवस्थेत किनाऱ्याला लागला आहे. सुमारे ३० ते ४० फूट लांबीचा हा मासा असून त्याचा बराच भाग कुजून गेला आहे. सध्या सुरू असलेल्या वादळामुळे हा मासा वाहत वाहत किनाऱ्यावर आला आहे.
समुद्रामध्ये काही दिवसांपूर्वी मेलेला हा व्हेल मासा समुद्राच्या लाटांबरोबर पुढे पुढे सरकत आज वायंगणी कांबळीवाडी येथील समुद्रकिनाऱ्याला लागला. या माशाबाबत कांदळवन विभाग व वनविभाग यांना कळविले आहे.
30 Oct 2025 04:50 PM (IST)
कुडाळ एमआयडीसीमधील प्लॉट नं. "जी ०२" मधील कचरा व्यवस्थापन प्रकल्पास येथील स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. याबाबत रहिवाशानी आमदार निलेश राणे यांची भेट घेत त्यांनी हरकत घेतली. मात्र, याबाबत प्रकल्पामुळे कोणतीही घाण किंवा वास होणार नाही याची आपण हमी देतो असे रहिवाशांना आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
एमआयडीसी कचरा प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी येथील एमआयडीसीवर स्थानिक रहिवाशांच्या शिष्टमंडळाने आमदार निलेश राणे यांची भेट घेत याबाबत हरकत घेतली. त्यानंतर प्रकल्पास्थळी हे रहिवासी एकत्र आले आणि प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीच्या भूमिपूजनासाठी आलेल्या निलेश राणे यांच्याकडे तेथेही आपली कैफियत मांडली.
30 Oct 2025 04:40 PM (IST)
उल्हासनगरात २०२१ साली गँगस्टर सुरेश पुजारीने भाजपा नेते अमित वाधवा यांना जीवे मारण्याची धमकी देत १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत.मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना मिळालेले अटकपूर्व संरक्षण रद्द केल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने टीम ओमी कलानीचा युवा नेता पंकज तिलोकानी याला अटक केली. तपासात उघड झाले की वाधवा यांच्या कल्पतरू क्रेडिट सोसायटीकडून चार जणांनी घेतलेले २ कोटींचे कर्ज न परत करता, त्यांनी पुजारीकडून धमकी देऊन वसुली रोखण्याचा प्रयत्न केला. वाधवा यांनी धमकीचे रेकॉर्ड पोलिसांना दिले होते. न्यायालयाने तिलोकानीला १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या अटकेनंतर सुरेश पुजारीच्या उल्हासनगरातील खंडणी नेटवर्कचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
30 Oct 2025 04:30 PM (IST)
देशात आणि राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली प्रभावीपणे राबविणारा पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने ऐतिहासिक मान पटकावला आहे. या उपक्रमाची दखल स्वतः देशाच्या नीती आयोगाने घेतली असून, आयोगाचे शिष्टमंडळ आज दोन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नीती आयोगाच्या डॉ. देवव्रत त्यागी, श्रीमती विदिशी दास या सदस्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या AI प्रणालीची संपूर्ण माहिती व सादरीकरण आयोगाच्या सदस्यांना देण्यात आले.नीती आयोगाचे सदस्य आज, ३० आणि उद्या ३१ ऑक्टोबर या दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून AI प्रणालीच्या कार्यप्रणालीचा सखोल अभ्यास करणार आहेत.
30 Oct 2025 04:20 PM (IST)
मीरारोडच्या सिल्व्हर पार्क परिसरातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरीचा गंभीर आरोप ग्राहकाने केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर ग्राहकाने सांगितले की, तो आपल्या वाहनात ₹५०० चे पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला होता. परंतु पंपावरील कर्मचाऱ्यांनी ग्राहकाचे लक्ष विचलित करून आणि बोलण्यात गुंतवून ठेवून पेट्रोल मीटर ‘झिरो’ न करता थेट पेट्रोल भरण्यास सुरुवात केली. अगोदरच्या ग्राहकाने ₹१५० चे पेट्रोल भरले होते, आणि त्याच ठिकाणाहून नवीन ग्राहकाच्या गाडीमध्ये पेट्रोल भरले गेले.
30 Oct 2025 04:09 PM (IST)
रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एम आय डी सी मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे..परतीच्या पावसाचा गैरफायदा घेत एम आय डी सी मधील काही कंपनी यांनी रासायनिक सांडपाणी सोनपात्रा नदीत सोडले जात आहे त्यामुळे नदीतील पाण्याचा रंग बदलला आहे तसेच नदीपात्र लगत असलेल्या कोतवली गावचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच दूषित पाण्यामुळे कोतवली येथील मच्छीमारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे संतापाची लाट पसरली आहे याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ का दुर्लक्ष करीत आहे असा सवाल आदिल मिठागरी व ग्रामस्ध यांनी उपस्थित केला
30 Oct 2025 04:08 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) चे महाड शहर अध्यक्ष पराग वडके यांनी कोकण रेल्वे मार्गावर महाड शहर हे जंक्शन करण्याच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.वडके यांनी सांगितले की, कोकण रेल्वेच्या निर्मितीपासून महाडला दुय्यम वागणूक मिळाली असून, जंक्शन झाल्यास व्यापार, उद्योग आणि प्रवास या तिन्ही क्षेत्रांना नवी गती मिळेल.उपोषणादरम्यान महाडचे तहसीलदार, पोलीस अधिकारी तसेच कोकण रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी देखील त्यांची भेट घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली आहे.
30 Oct 2025 03:53 PM (IST)
लोकप्रिय डान्सर आणि अभिनेत्री गौतमी पाटील नुकतीच नवनवीन मराठी चित्रपटामध्ये दिसली आहे. याशिवाय टेलिव्हिजनवरही तिने विविध कार्यक्रमामध्ये तिचे अभिनयकौशल्य दाखवले आहे. स्टार प्रवाहच्या ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमामध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केले.
30 Oct 2025 03:44 PM (IST)
गरपालिका निवडणुक आखाड्यात उतरण्यासाठी अनेक पहेलवान जोरबैठका काढायला लागले असून, निवडणूक आयोगाच्या आदेशाआधीच राजकीय पक्षांकडून उमेदवारीस योग्य पहेलवानांची चाचपणी सुरू झाली आहे.
30 Oct 2025 03:38 PM (IST)
मालकाच्या डोळ्यात विश्वासाचे धूळफेक करणारा चालकच २७ लाखांच्या रोकडचोरीचा सूत्रधार निघाला आहे. चालकाच्या मुलाने आखलेल्या योजनेनुसार वडिलांनी नाट्यमयरित्या स्वतःवर हल्ला झाल्याचे भासवत चोरी घडवून आणली.
30 Oct 2025 03:28 PM (IST)
उद्योगपती रतन टाटा यांनी अगदी मिठापासून एअर इंडियापर्यंत अनेक क्षेत्रात त्यांचा व्यवसाय विस्तारला आहे. ‘टाटा’ नावाला जगभरात ब्रँड बनवण्याचं काम रतन टाटा यांनी केलं. गेल्या काही वर्षांत टायटनने कारागिरी, विश्वासार्हता आणि डिझाइनमध्ये नवीन मानके प्रस्थापित केली.
30 Oct 2025 03:15 PM (IST)
साताऱ्यातून एक धाकदायक घटना समोर आली आहे. या घटनेने सातारा हादरला आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्याच रूममेटची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे.
30 Oct 2025 02:59 PM (IST)
राज्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसाने चांगलंच थैमना घातलं आहे. आधी गेल्या वर्षभरात अवकाळी आणि आता परतीच्या पासाने बळीराजाची दाणादाण उडाली आहे. गगनबावडा तालुक्यात सध्या भात कापणी हंगाम जोरात सुरू झाला आहे. शेतकरी भात काढणीच्या कामात गुंतले आहेत. शिवारात कामाची झुंबड उडाली आहे. अवकाळी पावसाची सततची भीती आणि बदलत्या हवामानामुळे शेतकरी पीक पदरात पाडून घेण्यासाठी अक्षरशः दिवस-रात्र काम करत आहे. सध्या ठीक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकरी वर्गाची तारांबळ उडत आहे.
30 Oct 2025 02:50 PM (IST)
सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटाचं टायटल साँग चित्रपटाच्या निर्मात्यांनी लाँच केले आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणारं हे गाणं असून, दोन दमदार गाण्यांनी चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आहे. २१ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
30 Oct 2025 02:42 PM (IST)
आज महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमनेसामने असणार आहे. हा सामना नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामान्यायाधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
30 Oct 2025 02:37 PM (IST)
Raigad Tamhini Ghat Accident: रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या एका कारवर दरड कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
30 Oct 2025 02:13 PM (IST)
Pune News: गेले काही दिवस पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिन व्यवहाराचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या व्यवहारावरून जैन समाज देखील चांगलाच आक्रमक झाला आहे. यावरून पुण्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. दरम्यान या प्रकरणात आता धर्मादाय आयुक्तांनी मोठा निर्णय दिला आहे.
30 Oct 2025 01:45 PM (IST)
तक्रारदार विधेश गोपाळ बाजारे (रा.रहिमतपूर, ता.कोरेगांव, जि. सातारा) यांना एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधून त्यांचे बँक खात्याची केवायसी न केल्यास त्यांचे बँक खाते बंद करण्यात येईल, असे सांगून तक्रारदार यांच्या व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवली. तक्रारदार यांनी सदरची लिंक उघडली असता तक्रारदार यांचे बँक खात्यातून रक्कम रुपये १६००० ट्रान्सफर झाल्याचे तक्रारदार यांचे लक्षात आले. तक्रारदार यांना त्यांची सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तक्रारदार यांनी फसवणुकीबाबत सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंद केलेली होती.
30 Oct 2025 01:35 PM (IST)
राज्यामध्ये पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीसाठी आवाज उठवला जात आहे. प्रहार नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या पूर्णकर्जमाफीसाठी आंदोलन झेडले. नागपूरमध्ये हजारो शेतकऱ्यांसह कडूंनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे नागपूरमध्ये पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकीय हालाचालींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील बच्चू कडूंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.
30 Oct 2025 01:15 PM (IST)
सॅमसंग लवकरच आपला प्रमुख स्मार्टफोन, गॅलेक्सी S26 अल्ट्रा लाँच करण्याची तयारी करत आहे. या स्मार्टफोनमध्ये नवीन डिझाइन, सुधारित कॅमेरे आणि लक्षणीय कामगिरी अपग्रेड असण्याची अपेक्षा आहे. असे वृत्त आहे की गॅलेक्सी S26 प्लस आणि गॅलेक्सी S26 प्रो पुढील वर्षाच्या सुरुवातीला गॅलेक्सी S26 अल्ट्रासोबत लाँच होऊ शकतात. असेही म्हटले जात आहे की सॅमसंग “एज” सोडूनS26 प्लस पुन्हा वापरु शकते. यावेळी गॅलेक्सी S26 अल्ट्रामध्ये काय खास टेक्नॉलॉजी असू शकते ते पाहूया.
30 Oct 2025 01:06 PM (IST)
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पालिका, नगरपरिषदांवर वर्चस्व मिळवण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच राजकीय पक्षांनी देखील मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर वडगाव मावळमध्ये देखील राजकारणाला उधाण आले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
30 Oct 2025 01:00 PM (IST)
अंबरनाथमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अंबरनाथच्या प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर किरण शिंदे त्यांच्या पतीने खलबत्त्यानं मारहाण केल्याचे समोर आले आहे. डोक्यात खलबत्याने हल्ला केल्याने डॉक्टर गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर बदलापूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. शिवाय त्यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या घटनेनंतर अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
30 Oct 2025 12:50 PM (IST)
तक्रारदार विधेश गोपाळ बाजारे (रा.रहिमतपूर, ता.कोरेगांव, जि. सातारा) यांना एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधून त्यांचे बँक खात्याची केवायसी न केल्यास त्यांचे बँक खाते बंद करण्यात येईल, असे सांगून तक्रारदार यांच्या व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवली. तक्रारदार यांनी सदरची लिंक उघडली असता तक्रारदार यांचे बँक खात्यातून रक्कम रुपये १६००० ट्रान्सफर झाल्याचे तक्रारदार यांचे लक्षात आले. तक्रारदार यांना त्यांची सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तक्रारदार यांनी फसवणुकीबाबत सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंद केलेली होती.
30 Oct 2025 12:41 PM (IST)
टिटवाळ्यात एका संतापजनक घटना समोर आली आहे. गहाण ठेवलेल्या दागिन्यांच्या वादातून सोनाराची अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी सोनाराकडून २ लाख रुपयांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास दरीत फेकून मारण्याची धमकी दिली. सोनाराने टिटवाळा पोलिसात धाव घेतली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार टिटवाळ्यातील खडवली येथे सोनार उगम चौधरी यांच्या सोबत घडला आहे.
30 Oct 2025 12:40 PM (IST)
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या मतचोरीच्या आरोपावर भाष्य केले.ते म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी विधान केलं. मत कुठे जातात त्या संदर्भात माहिती देत असतील आदित्य ठाकरे यांनी वरळी मधील माहिती दिली - राहुल गांधी यांनी देशभरातल्या मतदार यादीतही घोळ समोर आणला, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
30 Oct 2025 12:30 PM (IST)
शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्जमाफीसाठी प्रहार नेते बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नागपूरमध्ये रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांना मुंबईमध्ये सरकारने चर्चेसाठी बोलावले आहे. सायंकाळी सात वाजता बच्चू कडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मुंबईत चर्चा होणार आहे.
30 Oct 2025 12:20 PM (IST)
"आंदोलनावर सरकारने काल डाव टाकला म्हणून मी बाहेर पडलो. षडयंत्राला आणि डावाला प्रतिडावानेच उत्तर द्यावे लागेल. शेतकऱ्यांचे मुद्दे मी शिकतो आहे. आंदोलन कसं करायचं याचे सल्ले मी देऊ शकत नाही. 75 वर्षात शेतकऱ्यांना फक्त लुटले आहे," असा आक्रमक पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे.
30 Oct 2025 12:10 PM (IST)
माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बच्चू कडू यांनी सर्व शेतकऱ्यांनी पूर्णपणे कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी आंदोलन छेडले असून आता त्यांच्या आंदोलनाला आणखी बळकटी मिळाली आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी झाले आहेत.
30 Oct 2025 12:00 PM (IST)
तेजस्वी यादव यांनी प्रत्येक घरात सरकारी नोकरी देण्याच्या निवडणूक आश्वासनावर बोलताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "तेजस्वी पंतप्रधान मोदींसोबत खोटे बोलण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. बिहारमध्ये २.४५ कोटी घरे आहेत. ते म्हणतात की प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी दिली जाईल. भारत सरकारमध्ये ५५ मंत्री आहेत. संपूर्ण भारतात ३० लाख लोक सरकारमध्ये काम करतात. तेजस्वी म्हणतात की ते प्रत्येकी २.७५ कोटींना नोकरी देतील. बिहारचे लोक, सीमांचलचे लोक इतके भोळे नाहीत की तुम्ही येऊन त्यांना सहमती देऊ शकाल. त्याचा खर्च किती येईल? जर त्यांनी २.७५ कोटी लोकांना नोकरी दिली तर त्यांना मासिक पगार म्हणून किमान २५,००० रुपये द्यावे लागतील. त्यासाठी ८,२८,००० कोटी रुपये खर्च येतील. संपूर्ण बिहार सरकारचे बजेट दरवर्षी २ लाख कोटी रुपये आहे. पैसे झाडांवर उगवत नाहीत..." असा टोला असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे.
30 Oct 2025 11:50 AM (IST)
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्यांच्या 63व्या गुरुपूजा आणि 118व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यसैनिक पसुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या स्मृतीस्थळी भेट देत त्यांना पुष्प वाहिले.
30 Oct 2025 11:40 AM (IST)
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "... दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल यांच्या निधनानंतर, काँग्रेस पक्षाने त्यांना विसरण्यात कोणतीही कसर सोडली नाही. सरदार पटेलांसारख्या महान व्यक्तिमत्त्वाला भारतरत्न प्रदान करण्यात ४१ वर्षे विलंब झाला, कारण काँग्रेस पक्षाला त्यांच्याबद्दल आदर नव्हता. सरदार पटेलांसारख्या महान व्यक्तिमत्त्वासाठी संपूर्ण देशात ना समाधी बांधण्यात आली ना स्मारक बांधण्यात आले. जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन केले आणि सरदार पटेल स्मारक बांधले, जे एक भव्य स्मारक आहे जे जगभरात प्रसिद्ध झाले आहे."
30 Oct 2025 11:35 AM (IST)
२५ ते २८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत भारत आणि परदेशातील लाखो भाविकांनी आरोग्य आणि समृद्धीसाठी जलाशयांमध्ये सूर्यदेवाला उपवास आणि अर्पण करून छठ पूजा साजरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुभेच्छा दिल्या आणि धार्मिक विधींमध्ये भाग घेतला, तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता सारख्या राज्य नेत्यांनी १,००० हून अधिक घाटांची व्यवस्था केली. दिल्लीत, भाजप अधिकाऱ्यांनी उत्सवासाठी यमुना स्वच्छता प्रयत्नांना प्रोत्साहन दिले, परंतु आप आणि काँग्रेसच्या विरोधी पक्षांनी त्यांच्यावर नदी प्रदूषण आणि आरोग्य धोक्यांदरम्यान फिल्टर केलेल्या पाण्याने कृत्रिम सेटअप तयार केल्याचा आरोप केला. यामुळे यमुना नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण झाले असल्याची बाब समोर आली आहे.
30 Oct 2025 11:25 AM (IST)
एमडी ड्रग्स विकणाऱ्या पुण्यातील तस्कराला सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचे 32 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. मोहम्मद अझर हैदरसाहब कुरेशी असं अटक केलेल्या तस्कराचं नाव आहे.
30 Oct 2025 11:20 AM (IST)
एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समुदाय रस्ता रोको करणार असल्याने वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील समृद्धी महामार्गावर सुमारे ८०० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत.
#WATCH | Maharashtra: Around 800 police officers and personnel are on the Samruddhi Highway in Malegaon, Washim district, as the Banjara community is going to hold a road blockade, demanding ST reservations. pic.twitter.com/IiqrGlgtbd
— ANI (@ANI) October 30, 2025
30 Oct 2025 11:15 AM (IST)
नाशिकच्या द्वारका परिसरात गुंडांची दहशत वाढली आहे. कराड बंधूंच्या चिवडा दुकानावर अज्ञात टवाळखोरांनी कोयता आणि दगडाने हल्ला केला. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही, मात्र दुकानाचे नुकसान झाले आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेचा नाशिक पोलीस कसून तपास करत आहेत.
30 Oct 2025 11:10 AM (IST)
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आक्रमक मोर्चा काढला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये रस्ता रोको आंदोलन केले. यानंतर आता सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर तोडगा न निघाल्यास रेल्वे रोको करणार असल्याचा इशारा प्रहार नेते बच्चू कडू यांनी दिला आहे.
30 Oct 2025 11:02 AM (IST)
फलटण इथं डॉक्टर महिलेच्या मूळ गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव इथं हे आंदोलन सुरु आहे. ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत गावातील पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत असून या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करत आहेत.
30 Oct 2025 11:01 AM (IST)
व्ही. शांताराम यांनी तब्बल सहा दशके चित्रपटसृष्टी गाजवली. व्ही.शांताराम यांचे पूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे असे होते. त्यांनी एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक आणि अभिनेते म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि 'प्रभात फिल्म कंपनी' स्थापन केली, तसेच 'राजकमल कलामंदिर'ची स्थापना केली. 'अयोध्येचा राजा' (1932) हा प्रभातचा पहिला बोलपट, तर 'सैरंध्री' (1933) हा पहिला भारतीय रंगीत चित्रपट होता, हे त्यांचे उल्लेखनीय काम आहे.
30 Oct 2025 11:00 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत झालेली घसरण थांबली आहे. बुधवारीच्या व्यापार सत्रात सोने आणि चांदी दोन्हीही वाढले. सलग सहा व्यापार सत्रांच्या घसरणीनंतर, सोन्याने पुनरागमन केले आहे. बुधवारी, त्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम सुमारे २,६०० रुपयांची वाढ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १,२०,६२८ रुपयांवर पोहोचली. मंगळवारी, सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,१८,०४३ रुपयांवर होती. २४ तासांत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम २,५८५ रुपयांनी वाढली आहे.
30 Oct 2025 10:50 AM (IST)
PTI च्या वृत्तानुसार, ट्रम्प म्हणाले, “आम्ही चीनच्या अतिशय खास आणि आदरणीय राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहोत. मला वाटते की आम्ही आधीच अनेक गोष्टींवर सहमती दर्शविली आहे आणि आम्ही आणखी काही गोष्टींवर सहमती दर्शवू. अध्यक्ष शी जिनपिंग हे एका महान देशाचे महान नेते आहेत आणि मला विश्वास आहे की आमचे दीर्घकालीन चांगले संबंध असतील. त्यांच्याशी भेटणे हा सन्मान आहे.”
30 Oct 2025 10:40 AM (IST)
उत्तरप्रदेश येथून एका पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे. भररस्त्यात महिलेचा कथित स्वरूपात विनयभंग केल्याच्या आरोपाप्रकरणी एका कॉन्स्टेबलविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारेच कॉन्स्टेबल विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
30 Oct 2025 10:30 AM (IST)
Sacnilk.com नुसार, हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा चित्रपट “एक दीवाने की दिवानियत” ने त्याच्या प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी ₹२.७५ कोटींची कमाई केली आहे. तसेच, आयुष्मान खुराणा-रश्मिका मंदाना यांच्या “थामा” या चित्रपटाने त्याच्या नवव्या दिवशी ₹३.२५ कोटी कमावले आहेत. हे आकडे प्राथमिक आणि अंदाजे आहेत आणि या आकड्यात बदल होण्याची शक्यता आहे. या चित्रपटांच्या एकूण कमाईचा विचार करता, ‘एक दीवाने की दिवानियत’ ने एकूण ₹५२.२५ कोटी कमावले आहेत. दरम्यान, ‘थामा’ ने एकूण ₹१०४.६० कोटी कमावले आहेत. ‘थामा’ ने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे, तर ‘एक दीवाने की दिवानियत’ ने नुकताच ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.
30 Oct 2025 10:20 AM (IST)
व्हिडिओमध्ये दिसते की, थार चालक घाईघाईत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतो पण तितक्यात समोरुन एक मोठा ट्रक येतो आणि याला थार कारची धडक बसते. यानंतर मागून एक आणखीन ट्रक त्यांच्या दिशेने येताना दिसतो पण ही घटना पाहून दूरच तो थांबतो. जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही घटना कैद करण्यात आली आहे. या अपघातानंतर, आजूबाजूच्या परिसरात शांतता पसरली आहे. या अपघातामुळे थार चालकाचे चांगलेच नुकसान झाल्याची शक्यता आहे. फुटेज व्हायरल झाल्यानंतर, वापरकर्ते पावसात जास्त वेगाने गाडी चालवल्याबद्दल थार चालकाला दोष देत आहेत. दरम्यान, अपघातानंतर लोक थार चालकाबद्दल विचारणा करत आहेत. दरम्यान ही घटना कधी आणि कुठे घडून आली याची अधिकृत माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.
30 Oct 2025 10:10 AM (IST)
मोठी कारवाई करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव घरकुल लाच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात ९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थेट कार्यमुक्त करण्यात आलं आहे. येथील भाजप आमदार राजेश पवार यांनी अचानक कार्यालयाला भेट दिली होती. नागरिकांना घरकुल मंजूर करण्यासाठी अधिकारी लाच मागत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे,आमदारांनी अचानक भेट दिली आणि हा भ्रष्टाचार उघड झालं. लाच घेतल्याचं काही अधिकारी आणि कर्मचारी यांनी मान्य केलं होत. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी थेट कार्यमुक्तीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे, लाच घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.