Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rain Update : केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल होऊन वाटचाल ठप्पच; देशभरात पावसाची मोठी तूट

भारतीय हवामान खात्याच्या ताज्या आकडेवारीनुसार, ४ जून ते १६ जून २०२६ या कालावधीत मध्य भारतात सर्वाधिक ६५ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. या भागात सरासरी ५५.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १९.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 17, 2026 | 09:42 AM
मध्य भारतात पावसाची ६५ टक्के तूट

मध्य भारतात पावसाची ६५ टक्के तूट

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच केरळमध्ये वेळेआधी दाखल होऊनही नैऋत्य मान्सूनची देशभरातील वाटचाल जवळपास ठप्प झाली आहे. परिणामी, देशातील अनेक भागांमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून शेती, जलसाठे आणि पिण्याच्या पाण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

भारतीय हवामान खात्याच्या ताज्या आकडेवारीनुसार, ४ जून ते १६ जून २०२६ या कालावधीत मध्य भारतात सर्वाधिक ६५ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. या भागात सरासरी ५५.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १९.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य भारतात मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच महाराष्ट्र राज्यातील काही भागांचा समावेश होतो. या राज्यांतील खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून असल्याने पावसातील ही तूट चिंताजनक मानली जात आहे.

‘इच्छामरणा’वरील हा होता सुप्रीम कोर्टाचा पहिला निर्णय ! अरुणा शानबाग VS युनियन ऑफ इंडिया; भारतीय न्यायव्यवस्थेतील मैलाचा दगड !

पूर्व आणि ईशान्य भारतातही परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. या प्रदेशात १२५.८ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत केवळ ७७.५ मिमी पाऊस झाला असून, सुमारे ३८ टक्के तूट नोंदविण्यात आली आहे. सामान्यतः हंगामाच्या सुरुवातीला मुबलक पाऊस पडणाऱ्या अनेक भागांत यंदा दीर्घ कोरडा कालावधी दिसून येत असल्याने पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आर्द्रतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशपातळीवर तूट ३६ टक्के

देशपातळीवर पाहता या कालावधीत भारतात ५९.७ मिमी सरासरीच्या तुलनेत फक्त ३८.१ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण पावसाची तूट ३६ टक्क्यांवर पोहोचली आहे. याउलट वायव्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भागात तुलनेने समाधानकारक स्थिती आहे. वायव्य भारतात २४.४ मिमी सरासरीच्या तुलनेत २४.६ मिमी पाऊस पडला असून पाऊस जवळपास सामान्य राहिला आहे. दक्षिण भारतातही ६९.१ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत ५९.४ मिमी पाऊस झाल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येते.

अल निनोचा प्रभाव मजबूत होणार

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्री क्षेत्रांमध्ये प्रभावी कमी दाबाची प्रणाली किंवा अन्य हवामान यंत्रणा सक्रिय नसल्याने मान्सूनची प्रगती मंदावली आहे. उपग्रह चित्रांमधूनही मान्सूनशी संबंधित ढगांच्या संघटित पट्ट्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, प्रशांत महासागरातील अल निनोचा प्रभाव मजबूत होण्याची शक्यता असून, इतिहासात एल निनोचा संबंध भारतातील कमकुवत मान्सूनशी जोडला गेला आहे.

Web Title: Monsoon arrived early in kerala but people still waiting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • Climate Change
  • Indian Weather
  • Rain Update

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही मुसळधार बरसणार
1

राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही मुसळधार बरसणार

नागपूर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…
2

नागपूर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…

Weather Update : राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…
3

Weather Update : राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
4

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.